Babasaheb Aage Case Saam Tv
महाराष्ट्र

Babasaheb Aage Case: 'बाबासाहेब आगेंच्या हत्येनं मन सुन्न झालं', पंकजा मुंडेंनी स्वीकारली कुटुंबीयांची जबाबदारी

Pankaja Munde On Babasaheb Aage: भाजप नेते बाबासाहेब आगे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला. मंत्री पंकजा मुंडे यांनी बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारली.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडच्या माजलगाव शहरात भाजप नेते बाबासाहेब आगे यांची दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आज भाजपच्या नेत्या आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बाळासाहेब आगे कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगितले. 'बाळासाहेब आगे यांच्या हत्येने मन सु्न्न झालं. एक धडाडीचा कार्यकर्ता गमावल्याचे दुःख झाले.' असे म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली.

भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्याच्या पर्यावरण आणि वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्विकारली आहे. 'बाबासाहेब आगे यांच्या हत्येने मन सुन्न झालं. एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला.', अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. आगे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अनैतिक संबंधातून बाळासाहेब आगे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाल्याची बातमी जेव्हा कानावर आली, ते ऐकून मन सुन्न झाले. काहीच सुचत नव्हते.' बाबासाहेब आगेंच्या हत्या प्रकरणाच्या एका दिवसानंतर पंकजा मुंडे यांनी या घटनेवर आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

'आगे हे भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते होते, संघाचे संस्कार त्यांच्यावर असल्याने प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. माझ्या लोकसभा निवडणुकीत बुथ विस्तारक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने पार पाडली. अशा मनमिळावू कार्यकर्त्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाली हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या.'

तसंच, 'बाळासाहेब आगे यांच्या हत्येच्या घटनेचा मी तीव्र निषेध करते. जिल्हयात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाची मी भेट घेणार आहे. त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात माझा परिवार सहभागी आहे. आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करेल.' असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT