Cyber Crime : शेअर्समध्ये अधिकचा नफ्याचे आमिष पडले महागात; ७७ लाख रुपयांची फसवणूक

Online Fraud News Navi Mumbai: ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. दरम्यान याबाबत सायबर पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत असताना देखील अनेकजण आमिषाला बळी पडताना दिसून येत आहेत
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असताना देखील आमिषाला बळी पडत आहेत. असाच प्रकार पुन्हा एकदा एकदा नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकच नफा मिळेल. असे सांगत गंडा घालण्यात आला आहे. या प्रकारात सदर इसमाची तब्बल ७७ लाख रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. दरम्यान याबाबत सायबर पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत असताना देखील अनेकजण आमिषाला बळी पडताना दिसून येत आहेत. अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे दिलेली लिंक ओपन करून किंवा अँप डाउनलोड करत असतात. यानंतर खात्यातून रक्कम काढली जात असते. शिवाय वेगवेगळे आमिष दाखवून पैसे लाटत फसवणूक केली जाते. 

Cyber Crime
Sambhajinagar Crime : रागाने बघितल्याने दोन गटात तुफान राडा; संभाजीनगरात जुन्या वादातून कुरापत, तिघे जखमी

सुरवातीला दाखविला नफा 

असाच प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. या प्रकार राकेश रोशन यांची फसवणूक झाली आहे. शेअर्स ट्रेडिंगमध्ये अधिकचा नफा मिळेल, असे भासवून राकेश यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांना पैसे भरण्यास सांगून एका डोमेनवर आर्थिक नफा होत असल्याचे दाखविले. यातून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणात फसवणूक झाल्याचे राकेश यांच्या लक्षात आले. 

Cyber Crime
Maharashtra BJP : भाजपचा आता दर महिन्याला जनता दरबार; दरबारातून जनतेला काय मिळणार?

सायबर पोलिसात गुन्हा दाखल 

फ्रेडएक्स या डोमेनचा वापर करुन राकेश रोशन या इसमाची तब्बल ७७ लाख ७५ हजार रुपायांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राकेश यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. यावरून गुन्हा दाखल कारण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com