Maharashtra BJP : भाजपचा आता दर महिन्याला जनता दरबार; दरबारातून जनतेला काय मिळणार?

Mumbai News : केंद्र व राज्य शासनाशी संबंधित असलेल्या विविध विभागांबाबत काही तक्रारी असतात. या विभागांबाबत असलेल्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट मंत्र्यांच्या उपस्थितीत मांडण्याची संधी दिली जाणार
Maharashtra BJP
Maharashtra BJPSaam tv
Published On

गणेश कवडे

मुंबई : जनतेला आपल्या तक्रारी मंत्र्यांसमोर मांडता याव्या; या अनुषंगाने भाजपकडून जनता दरबार भरविण्यात येणार आहे. हा जनता दरबार दर महिन्याला भरविण्यात येणार आहे. याची सुरवात २२ एप्रिलपासून करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. 

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात पत्र जारी केले असून केंद्र व राज्य शासनाशी संबंधित असलेल्या विविध विभागांबाबत काही तक्रारी असतात. या विभागांबाबत असलेल्या जनतेच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट मंत्र्यांच्या उपस्थितीत मांडण्याची संधी या उपक्रमातून दिली जाणार आहे. अर्थात जनता दरबारामध्ये आलेल्या जनतेच्या तक्रारींचा निपटारा मंत्र्यांना करता येणार आहे.  

Maharashtra BJP
Navapur News : रस्त्याचे काम केवळ कागदावर; काम सुरु केले नसताना दाखविले ६१ टक्के काम, ठेकेदाराने काढले ४१ लाख रुपये

प्रदेश कार्यालयात भरणार दरबार 

भाजपकडून घेण्यात येणार हा जनता दरबार दर महिन्याला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार आहेत. यात पहिला जनता दरबार हा मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे. 

Maharashtra BJP
Dhule : धुळे जिल्ह्यातील जलसाठे निम्म्यावर; पाणीबाणीचे संकट उभ राहण्याची भीती

२२ एप्रिलपासून उपक्रमाची सुरवात 

दरम्यान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रतर्फे आगामी २२ एप्रिल २०२५ रोजी जनता दरबार या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा जनता दरबार मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केला आहे. यामुळे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com