Ravindra Chavan Saam TV
महाराष्ट्र

Satara News: वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघात टाळा: मंत्री रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan News: कोणीतरी आपली वाट बघत आहे. याची जाणीव ठेवून वाहने चालवा. वाहन चालविताना कोणतेही व्यसन करू नका. वाहतुकीचे नियम काटेकोर पाळा. यामुळे अपघातांना आळा बसेल, असं मंत्री चव्हाण म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

Satara News:

कोणीतरी आपली वाट बघत आहे. याची जाणीव ठेवून वाहने चालवा. वाहन चालविताना कोणतेही व्यसन करू नका. वाहतुकीचे नियम काटेकोर पाळा. यामुळे अपघातांना आळा बसेल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पोवाईनाका, सातारा येथे रस्ते सुरक्षा अभियान 2024 निमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यांची गुणवत्ता वाढल्यामुळे वाहनांचा वेग वाढवला जात आहे. त्यातून अनेक अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा अभियान हे मिशन मोडवर प्रभावीपणे राबवा, असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

ते म्हणाले, रस्ते सुरक्षा अभियानामध्ये वाहन चालकाची दृष्टी दरमहा तपासली पाहिजे. काही दोष असल्यास त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत. पंतप्रधान सडक योजनेत रस्त्यांचे उत्तम स्टॅंडर्ड तयार करून देण्यात आले आहे. त्यामुळे गावापासून शहरापर्यंत येणारे रस्ते कशाप्रकारे समृद्धी आणू शकतात , हे आपण पाहत आहोत. येणाऱ्या काळातही असेच उत्तम रस्ते करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.  (Latest Marathi News)

यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे म्हणाले, विकसित देशांमध्ये ज्या दर्जाचे रस्ते आहेत त्या दर्जाचे रस्ते आपल्याकडेही व्हावेत यासाठी तांत्रिक समितीला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. दर्जा बदलासाठी रस्ता बांधणीसाठीची स्पेसिफिकेशन्स बदलणे आवश्यक आहे.

आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले म्हणाले, मतदार संघातील व जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे अधिक चांगले व्हावे , यासाठी जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा. रस्त्यांवरील अपघातात टाळण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये जनजागृती करावी. ड्रायव्हिंग लायसन्स देत असताना उमेदवाराच्या कौशल्याची कसून चाचणी व्हावी. जिल्हा परिषदेच्या दर्जांचीही गुणवत्ता वाढावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sparrow Behavior: चिमणी कोणतं अन्न खाते? ही माहिती वाचून बसेल धक्का

Maharashtra Live News Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २५ मिनिटे उशिरा

Thursday Horoscope: करिअरमध्ये नवीन संधी येणार; पण जास्त कष्ट घ्यावे लागणार, 'या' राशींच्या व्यक्तींना कर्मचाऱ्यांकडूनच त्रास होणार

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT