''ही (महाराष्ट्राची) लढाई करणारी भूमी आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आम्ही बघितले. हे आंदोलन दीर्घ काळ चालणारे आहे'', असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले आहेत. शिवाजी मंदिर येथे स्व. शशिकांत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आंदोलन पुन्हा करणार अहोत. शेतकऱ्याचा पिकाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आपलं शेत विकत आहेत. भारत सरकारमुळे शेतकऱ्यांना समस्या निर्माण होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राकेश टिकैत म्हणाले, ''बाहेर देशात पण ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले जातात. येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा असेच आंदोलन करावं लागणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आंदोलन केले, त्यामुळे मुंबईच्या वेशीवर मंत्री तुम्हाला भेटायला आले. तुमची ताकद एकत्र आली तेव्हा सरकार तुमच्याकडे आले. तुम्ही असेच एकत्र येऊन मुंबईला घेरा तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. पंजाबमध्ये सर्व शेतकरी एकत्र आले आणि मराठा समाज जर अमच्या सोबत आला तर, आम्हाला आनंद वाटेल.'' (Latest Marathi News)
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीही उपथित लोकांना संबोधित केलं. ते म्हणले आहेत की, ''सगळ्या मराठा नेत्यांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. मी प्रामाणिक पणे लढत आहे. सगेसोयरे यांचा एकदा कायदा पारित झाला की, आपली लढाई संपेल.''
ते म्हणाले, ''57 लाख मराठे ओबीसीमध्ये आले आहेत. सरकार डाटा देत नाही. माझ्या मते दीड कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आहेत. पहिल्यांदा मराठे एकत्र आले आहेत. 24 तास काम करत आहे.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.