औरंगाबाद पंचायत समितीत राडा! उपसभापतींना दालनात घुसून मारहाण Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद पंचायत समितीत राडा! उपसभापतींना दालनात घुसून मारहाण

आरोप उपसभापती अर्जुन शेळके यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे नाराज पंचायत समितीचे सदस्य अर्जून शेळके यांनी भाजपशी जवळीक केली.

माधव सावरगावे, औरंगाबाद

औरंगाबाद पंचायत समितीच्या (Aurangabad Panchayat Samiti) निवडणुकीत भाजपसोबत जाऊन उपसभापतीपद (Deputy Speaker Arjun Shelake) मिळवल्यानं संतापलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी उपसभापतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसा आरोप उपसभापती अर्जुन शेळके यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे नाराज पंचायत समितीचे सदस्य अर्जून शेळके यांनी भाजपशी जवळीक केली.

त्यात भाजपच्या पाठिंब्यामुळे औरंगाबाद पंचायत समितीच्या उपसभापती विजय झाले. याचा राग काँग्रेसच्या सदस्यांना होता. यात काँग्रेस सदस्यांचा पराभव झाला. त्याचमुळे उपसभापती अर्जुन शेळके यांना दालनात घुसून काँग्रेसच्या काही सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीला भेट दिली आहे.

घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कार्यालयात झालेली धरपकड आणि खुर्च्या भिरकावल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काही खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. औरंगाबाद पंचायत समितीत एकूण 20 सदस्य पैकी काँग्रेसचे 8, भाजप-7, सेना-3 अपक्ष-2 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KBC 17: कृष्णाने अचानक अमिताभ बच्चन यांना विचारली त्यांची फी; बिग बी उत्तर देत म्हणाले...

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

SCROLL FOR NEXT