डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी रोहन गायकवाड यांचा लॉकडाऊन मध्ये कामधंदा बंद झाला. त्यामुळे महावितरणचे वीजबिल ते भरू शकले नाहीत. महावितरणला विनंती करून सुद्धा त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. त्यामुळे ते हताश होऊन टिटवाळ्याला रहायला गेले. दिड वर्षात तब्बल ८०,००० रुपये वीज बिल त्यांच्या डोक्यावर होते. टप्प्याटप्प्यानी त्यांनी ४० हजार रुपये बिल भरले. मात्र उर्वरीत ४०,००० रुपयांकरिता त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी विजबिलावर लावण्यात आलेला व्याज कमी करावा अशी मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली.
मात्र महावितरणने काहीही न ऐकता वीज जोडणी केलीच नाही. अखेर त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवत उर्वरित ४० हजार रुपये भरले आहेत. त्यांनी याबाबत महावितरण पत्र सुद्धा दिले होते. २०१६-१७ ला आलेली नवं प्रकाश योजना हि पून्हा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जेणे करून नागरिकांना दिलासा मिळेल.
याबाबत रोहन गायकवाड यांनी सांगितले की मला वीज बिल आलं होतं लॉकडाऊन मध्ये ८०,००० त्यामधील ४०,००० रुपये मी हळू हळू भरले. मात्र माझे मिटर कापले, म्हणून मी साहेबांकडे गेलो मी बिल भरतो वरचे व्याज कमी करा, साहेब म्हणाले तस होणार नाही. माफ काही करता येणार नाही. तुम्हाला सर्व बिल भरावेच लागेल. लॉकडाऊन पासून मला फारशी कमाई नाही. मी रिक्षा चालवतो आणि ग्रीलचे काम करतो. आज मी बिल भरतोय पण माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवुन. माझी आता एकच इच्छा आहे जी २०१६-१७ ची योजना सुरू होती, ती शासनाने सुरू करावी जेनेकडून दुसऱ्याना फायदा होईल. त्यामुळे आतातरी ही योजना आणली जाईल का हे पाहावे लागेल.
या सगळ्याला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे.महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वेळेला हे सांगण्याचा प्रयत्न केला, अधिवेशनात सांगण्याचा प्रयत्न केला.लॉकडाऊन मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही बिलामध्ये सवलत देऊ. पण आता शासनाची भुमिका एकदम बदलली आहे.त्यामुळे या सर्वास तिघाडी शासन जबाबदार आहे. - रवींद्र चव्हाण, भाजप आमदार
सरकारने अशी योजना सरसकट आणली पाहिजे. सर्वसामान्य घरघुती कमीतकमी व्याज माफ केल पाहिजे. मोठं मोठ्या उद्योगपतींचे करोडो रुपयांचे बिल माफ करता. लोकांना आता कोरोना काळात दिलासा द्यायला काय अडचण आहे. आमची मागणी आहे कमीत कमी घरगुती विजवापर करणाऱ्या ग्राहकांना व्याज लागला असेल तर तो माफ करून एका दृष्टीने दिलासा दिला पाहिजे. या संदर्भात मी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करेल.
- राजू पाटील, मनसे आमदार
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.