मुंबई : मॉन्सून Monsoon हंगाम यंदा राज्यामध्ये state जुलै अखेरपर्यंत सरासरी तुलनेमध्ये २४ टक्के जास्त पावसाची Rain नोंद करण्यात आली आहे. १ जून ते ३१ जुलैपर्यंत सरासरी ५३८.५, ऐवजी ६६९.९ मिलिमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. आता उर्वरीत हंगामात season सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने यावेळी वर्तवला आहे.
ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सरासरीच्या ९५ ते १०५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील असे हवामान विभागाने Weather Department सांगितले आहे. राज्यामधील बहुतांश भागांत पावसाची १ जून ते ३१ जुलैच्या दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु, मध्य महाराष्ट्राच्या Maharashtra नंदूरबार Nandurbar आणि धुळे Dhule या ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे.
हे देखील पहा-
धुळे या ठिकाणी सरासरीपेक्षा २३ टक्के, तर नंदूरबार या ठिकाणी ४३ टक्के कमी पावसाची नोंद यावेळी करण्यात आली आहे. या उलट साताऱ्यामध्ये सरासरीपेक्षा ७० टक्के आणि परभणीत ७१ टक्के जास्त पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यामध्ये पावसाने ओढ चांगलीच दिली आहे.
मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार एंट्री केली आहे. कोकण आणि घाट भागावर अतिवृष्टीने दरड कोसळण्याचे घटना देखील घडल्या आहेत. कोल्हापूर, सातारा, कोकणात मागील काही दिवसांत पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. राज्यामध्ये रविवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
तसेच कोकणात बहुतांश जागी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. महाराष्ट्रामधील काही भागांत पावसाचा अधिक जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने यावेळी वर्तवली आहे. पुढील ४ दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच विदर्भात सुरू असलेल्या, पावसाचा जोर देखील आता कमी होत आहे.
मात्र, मराठवाड्याबरोबर उर्वरित राज्यात पाऊस ओसरत आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर भागात कमी दाब क्षेत्र आहे. ते बांग्लादेश, पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले आहे. यामुळे राज्यामधील पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे. उत्तर भारतात मॉन्सूनचा ट्रफ फिरोजपूर, हिस्सार, मिरूत, हारडोई, सुलतानपूर, नालंदा आणि बोकारो या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेत.
बांग्लादेशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगाल ते बंगालचा उपसागरचा वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र हे सक्रिय आहे. हे क्षेत्र समद्रसपाटी पासून ९०० मीटर उंच आहेत. तसेच दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर केरळ या भागात कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे कोकणात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाचा जोर कमी प्रमाणात राहणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.