Aurangabad and Osmanabad Name Change Hearing Saam TV
महाराष्ट्र

Breaking News : औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय उलटा फिरणार? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

Aurangabad and Osmanabad Name Change Hearing: औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतराचा निर्णय हा राजकीय हेतूने घेण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Satish Daud

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने युक्तीवाद ऐकून घेत राज्य सरकारच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाला सु्प्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलंय. आज यावर महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.

या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचे नामांतराचा निर्णय हा राजकीय हेतूने घेण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर महायुती सरकारने देखील दोन्ही शहराच्या नामांतरासाठी प्रयत्न केले. त्यानुसार, उस्मानाबादचे (Osmanabad) नामांतर 'धाराशिव' तर औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' असे करण्यात आले. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर याचिका फेटाळून लावली.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सांगत हायकोर्टाने नामांतराच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला. मात्र, हायकोर्टाचा हा निर्णय याचिकाकर्त्यांना पटला नाही. त्यांनी तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. नामांतरचा हा निर्णय निव्वळ राजकीय हेतूनंच घेण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांच म्हणणं आहे

राज्य सरकारकडून निजामांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा देखील याचिकेत मांडण्यात आला आहे. आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट ही याचिका स्वीकारून नामांतराबाबत नेमका काय निर्णय देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT