Imtiyaz Jaleel Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: MIM चं मिशन लोकसभा! इम्तियाज जलील यंदा मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात? 10 जागांवर उतरवणार उमेदवार

Imtiyaz Jaleel News: लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज जलील हे थेट मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, तशी एमआयएमची चाचपणी सुरू आहे.

डॉ. माधव सावरगावे

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज जलील हे थेट मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, तशी एमआयएमची चाचपणी सुरू आहे. संभाजीनगरमध्ये दुसरा उमेदवार देऊन स्वतः इम्तियाज हे मुंबईतून इच्छुक आहेत, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांचा फार्मूला अजून स्पष्ट झाला नसला तरी एमआयएमने लोकसभा निवडणुकीत कोण कुठे उतरवायचं याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएम मुंबईत पूर्ण ताकदीने उमेदवार देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राज्यातील एमआयएमचे एकमेव खासदार असलेले इम्तियाज जलील यांना मुंबईतून लोकसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तशी त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली आहे, असं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएमने एकत्रित लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात एमआयएमची इम्तियाज जलील यांना मोठी मदत झाली होती. मात्र आता यंदा एमआयएम एकटीच रिंगणात उतरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयएमचा कोणताही उमेदवार निवडून येऊ शकतो, असा विचार करून मुंबईतून इम्तियाज जलील हे लोकसभा लढवण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचा निर्णय एमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी हेच घेणार आहेत.  (Latest Marathi News)

येत्या १८ फेब्रुवारीला एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी महाराष्ट्रातून लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बाळासाहेब आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेला अकोल्यातून होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दहापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार उभे असणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, मुंबई, धुळे मालेगाव यासह वेगवेगळ्या मुस्लिम बहुल मतदार असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. मात्र, यात सर्वाधिक चर्चा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

एमआयएम आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. इम्तियाज यांना यावेळी इथे विजय दिसत नाहीये. त्यामुळं त्यांनी हा मतदार संघ सोडून मुस्लिम बहुल भागातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असेल. मात्र महाराष्ट्रात त्यांना कुठेही थारा मिळणार असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय

दरम्यान, एमआयएमच प्लॅनिंग जरी असं असलं तरी यावेळी त्यांची एक जागा कायम ठेवण्याचा आव्हान असणार आहे. मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीची मोठी मदत असल्यामुळे एमआयएमची नौका तरून गेली. पण केवळ मुस्लिम मतांवर स्वार होऊन लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्लॅन एमआयएमचा जरी असला तरी ते या निवडणुकीत शक्य होईल की नाही, हा येणारा काळ ठरवेल. पण सध्या तरी युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चेपूर्वी एमआयएमने चर्चेत बाजी मारली, हे मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT