Aurangabad News  Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News : रक्षकच बनला भक्षक! चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच व्यापाऱ्याला लुटलं

या कृत्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया, साम टीव्ही

Aurangabad Today News : औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मित्रासह सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद (Aurangabad) शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलीस (Police) कर्मचाऱ्याचे नाव असून, तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसांत सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. (Aurangabad Crime News)

आरोपी पोलीस अंमलदार संतोष वाघ याचा मित्र रामचंद्र दहिवाळ हा सराफा व्यापारी आहे. त्यामुळे या दोघांनी लुटमारीचा कट रचला. दहिवाळ याने सोने दाखविण्याच्या बहाण्याने सराफा व्यापारी अशोक विसपुते (रा. जळगाव) यांना बोलावून घेतले. दहिवाळ याच्यावर विश्वास ठेवून विसपुते औरंगाबादला आले. यानंतर दहिवाळ याने व्यवहार जमणार नसल्याचे सांगितले.

व्यवहार हुकल्यामुळे विसपुते परत निघाले असतानाच संतोष वाघ याने केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचा सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवून तब्बल 24 तोळे सोनं आणि 8 लाख 40 हजार रुपये कॅश सराफा व्यापाऱ्याकडून लुटले. आणि तो पसार झाला. सराफा व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली. (Aurangabad Police News)

यानंतर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेला संतोष वाघ याने ज्वेलर्सला अडवून 24 तोळे सोने, 8 लाख 40 हजार रोख रक्कम चोरली याप्रकरणी गुन्हा दाखल आहे, दोन आरोपी अटक आहे.

तपास सुरू गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. एकंदरीतच पोलीस कर्मचाऱ्यानेच केलेल्या या कृत्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Style: श्रावणात सणासुदींना साडीवर करा 'या' सुंदर बन हेअरस्टाइल्स

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT