Uday Samant : वेदांतासारखाच नाणार पण जाणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय सांगितलं? वाचा...

नाणारचा प्रकल्प रिफायनरी सुद्धा गुजरातला हलवणार असल्याची चर्चा सुरू झालीये.
Uday Samant / Eknath Shinde
Uday Samant / Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार देणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. वेदांत प्रकल्पावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीकेचा भडीमार करत आहेत. दरम्यान, एकीकडे वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेल्यानंतर आता दुसरीकडे नाणारचा प्रकल्प रिफायनरी सुद्धा गुजरातला हलवणार असल्याची चर्चा सुरू झालीये. या चर्चेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Uday Samant / Eknath Shinde
Vedanta Foxconn : 'वेदांता'वरून शरद पवारांनी 'त्या' एकाच वाक्यात PM मोदी, CM शिंदेंवर साधला निशाणा

काय म्हणाले उदय सामंत?

वेदांता प्रकल्पाबरोबरच आता नाणारचा रिफायनरी प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून गुजरातला जाणार का? असा प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, 'रिफायनरी प्रकल्प बाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्यात अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. काही राजकीय लोक दुटप्पी भूमिका घेत आहेत. नाणारचा प्रकल्प कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात आणखी नवीन उद्योजक आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत' उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

नाणार प्रकल्प आहे तरी कसा?

आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.

Uday Samant / Eknath Shinde
सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? पवारांचा CM शिंदेंना टोला

नाणारच्या गुंतवणुकीत खोडा घालू नका

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. एकट्या महाराष्ट्रात भाजप-सेना युतीच्या सरकारच्या काळात यायची. आता राज्यात पुन्हा तीच युती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटील यांनी फार काळजी करण्याची गरज नाही. आता वेदांची 1.58 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणाऱ्या 3.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com