Bengaluru Flight News Saam TV
महाराष्ट्र

Bengaluru Flight News: विमानानं टेक ऑफ केल्यानंतर प्रवाशानं इमर्जन्सी डोअर उघडण्याचा केला प्रयत्न; बेंगळुरूत काळजात धडकी भरवणारी घटना

Attempts To Open Emergency Door: विमान हवेत उंचावर उडत असताना एका प्रवाशाने थेट आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलाय.

Ruchika Jadhav

Paris Bengaluru Flight News: पॅरिसहून बंगळुरूच्या दिशेने येत असलेल्या एअर फ्रान्स विमानातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विमान हवेत उंचावर उडत असताना एका प्रवाशाने थेट आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलाय. (Latest Marathi News)

या घटनेमुळे विमानातील प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. तसेच सर्व भयभीत झाले होते. बंगळुरूत विमान उतरल्यावर आरोपी प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. व्यंकट असं या प्रवाशाचं नाव असून तो आंध्र प्रदेशचा रहिवासी असल्याचं समजलं आहे.

आरोपी व्यक्ती बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अमेरिकेतील एका किराणा दुकानात डेटा इंजिनिअर म्हणून काम करत होता. बंगळुरूत (Bengaluru) आपल्या काकीला भेटण्यासाठी तो निघाला होता. यावेळी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.

एअर फ्रान्सकडून सदर प्रवाशाविरोधात केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केलीये. आरोपी प्रवाशाविरोधात अधिनियम १९३७, कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी प्रवाशाला जामिनावर सोडून दिलं आहे. दरम्यान चौकशीवेळी आरोपीने आपण असं का केलं या मागचं कारण सांगितलंय. मी फक्त दरवाजा नीट उघडतोय आणि पुन्हा बंद होतोय का? ते तपासून घेत होतो, असं प्रवाशांने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT