Supreme Court on Manipur Viral Video Incident : मणिपूरचा व्हिडिओ आत्मा ढवळून काढणारा; सुप्रीम कोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं

SC reaction on Manipur's Viral Video : मणिपूरमधील दोन महिलांसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
supreme court on Manipur News
supreme court on Manipur Newssupreme courts stand on Manipur viral video
Published On

Supreme Court reaction on Manipur viral video incident :

मणिपूरमधील दोन महिलांसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कोर्टानं स्वतःहून दखल घेत, कारवाईबाबत केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे. ही बाब स्वीकारार्ह नाही. जे व्हिडिओ समोर आले आहेत, ते खूपच चिंताजनक आहेत. या प्रकरणात मे महिन्यातच कारवाई व्हायला हवी होती. अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, अशी कठोर टिप्पणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी केली.(tajya Batmya)

supreme court on Manipur News
PM Modi On Manipur Viral Video : मला प्रचंड राग आलाय; दोषींना सोडणार नाही; मणिपूरमधील घटनेवर PM मोदींना संताप अनावर

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी सॉलिसिटर जनरल आणि अॅटर्नी जनरल यांना या घटनेप्रकरणी कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले. समाजमाध्यमांवर जे बघितलं त्याने आम्ही खूपच डिस्टर्ब झालो आहोत. ही मानवाधिकार आणि महिलांच्या अधिकारांचे उघडपणे उल्लंघन आहे. केंद्र आणि राज्य सरकारला या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देत आहोत, असे कोर्टाने म्हटले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात या प्रकरणी २८ जुलै रोजी सुनावणी होईल. त्यात केलेल्या कारवाईसंदर्भात माहिती घेण्यात येईल.

supreme court on Manipur News
Manipur News : भयावह! मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

'या घटना खपवून घेऊ शकत नाहीत'

मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावर फिरवल्याच्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाने कठोर टिप्पणी केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, लोकशाही देशात अशा प्रकारच्या घटना खपवून घेऊ शकत नाहीत. महिलांच्या अधिकारांच्या संदर्भातील अशा प्रकारच्या घटना आत्मा ढवळून काढणाऱ्या आहेत. हे संविधानाच्या अधिकारांचे हनन आहे.

४ मे २०२३ रोजी घडली होती घटना

महिलांवरील अत्याचाराची ही घटना ४ मे रोजी घडली होती. त्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आधीच एफआयआर दाखल केला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल, असे मणिपूर पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. बुधवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com