Anil Deshmukh : Saam tv
महाराष्ट्र

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे. याचदरम्यान, दुसरीकडे नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून परतताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काटोल येथील तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ एका व्यक्तीने त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला आहे. यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोणी केला हल्ला?

अनिल देशमुख नरखेड येथील सभेतून परताना हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांनी या दगडफेकीचा आरोप भाजपवर केला आहे. दुचाकीवरून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेची ठोस माहिती मिळालेली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'प्रचार संपवून परतताना अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला आहे. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. या घटनेचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता राज्यात नव्हती. आपलं राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे'.

'भाजप काळात राज्यातील विशेषत: नागपुरात कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. या घटनेचा तीव्र निषेध', असे सुळे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT