Deepak Kesarkar On Maharashtra Ssc Board Result 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जागावाटपावरुन महायुतीत जुंपणार? शिंदेसाहेब १०० जागांसाठी ठाम: दीपक केसरकरांचं विधान

Deepak Kesarkar : विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरुन जुंपणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनंतर शिवसेनेही थेट १०० जागांवर दावा ठोकलाय. शिवसेनेच्या या दाव्यामुळे महायुतीला तडे जाण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

शंभर जागांच्या बाबतीत शिंदे साहेब ठाम आहेत. भाजपमध्ये सुद्धा चर्चा झाली आहे. ९० ते ९५ जागा शिवसेनेने लढवाव्यात. तर ६० च्या आसपास अजित पवार यांनी लढवाव्यात, असं विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधूदुर्गातील पत्रकार परिषदेत केलं.

काय म्हणाले दीपक केसरकर

१०० जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहेत. भाजपमध्ये सुद्धा चर्चा झालीय. ९० ते ९५ जागा शिवसेनेने लढवाव्यात. तर ६० च्या आसपास अजित पवार यांनी लढवाव्यात. तर १५० ते १६० भाजपने लढवाव्यात. मात्र शिंदे साहेबांचं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी बोलणं होईल तेव्हा काही कमी जास्त होतील. मात्र आम्ही काही २८८ जागांची तयारी करत नाहीत. आम्ही १०० सीटवरच तयारी करतोय. त्यामुळे आमच्यामधील महायुती घट्ट आहे आपण अजिबात काळजी करू नका, असं दीपक केसरकर म्हणालेत.

स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मुदद्यावरुन बोलतांना केसरकर म्हणाले, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय सिंधुदुर्गात बसून होणार नाही. तो निर्णय मोदी साहेब, शहा, आणि नड्डा घेतील. महायुती म्हणून आमच्यात एक कॉमन धागा आहे तो हिंदुत्वाचा आणि त्या धाग्यावर आम्ही चालत राहणार आहे. युती तुटून वेगवेगळे लढण्याचे वातावरण सध्या नाही. मोदी साहेबांची लाट होती, त्यावेळेस युती तुटली तरी सुद्धा एका पक्षाची सत्ता येऊ शकली नाही. मग आता काय सत्ता येणार आहे? त्यामुळे प्रत्येकाने समजूतदारपणाची भुमिका घ्यावी लागेल. कोणी किती जागा लढवाव्यात यावर मतभेद होऊ शकतात मात्र युती कोणत्याही परिस्थितीत तुटणार नसल्याचं केसरकर म्हणाले.

वाद होण्याची शक्यता

लोकसभेच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या मेळाव्या बोलतांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेसाठी १०० जागांवर दावा केला होता. विधानसभेत लोकसभेसारखं चालणार नाही, शिंदे गटाला जितक्या जागा दिल्या जातील तितक्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, विधान केलं होतं. शिंदे गटाकडे जेवढे आमदार आहेत तेवढेच आमदार अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला जेवढ्या जागा सोडल्या जातील तेवढ्याच जागा आम्हाला सोडाव्यात असे भुजबळ म्हणाले होते.

पण शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला भाजपला मोठा भाऊ मानत राष्ट्रवादीला सर्वात धाकटा भाऊ मानलंय. राष्ट्रवादीला फक्त ६० जागा देऊ केल्यात. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे महायुतीत परत एकदा जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT