शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाही, मात्र नारायण राणेंनी ते शक्य करून दाखवलं: दीपक केसरकर
Deepak Kesarkar On Narayan RaneSaam Tv

Maharashtra Politics: शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाही, मात्र नारायण राणेंनी ते शक्य करून दाखवलं: दीपक केसरकर

Deepak Kesarkar On Narayan Rane: महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाहीत. मात्र नारायण राणे यांनी स्वतः सह ११ आमदारांचे राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवले : दीपक केसरकर
Published on

Deepak Kesarkar On Narayan Rane:

>> विनायक वंजारे

''कोकणात ज्या ज्या नेत्यांची सत्ता येते, त्या त्या नेत्यांना मंत्रिपद मिळतात. नारायण राणे यांना कोकणातील प्रतिनिधी म्हणून दिल्लीत मनाचे स्थान मिळाले आहे. मात्र आमच्या खासदारांना (विनायक राऊत) कोणी ओळखत नाही, ते प्रती मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात वावरत होते'', अशी घणाघाती टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली आहे. सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना जाते असं म्हणाले आहेत.

कोकणात जे खासदार म्हणून निवडून येतात, ते केंद्रात मंत्री होतात. नारायण राणे निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री होतील. राणेंना कोकणचा वाघ म्हणून ओळखला जातो, नारायण राणे यांची कोकणचा नेता म्हणून प्रतीमा आहे, अशी स्तुती सुमने दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर उधळली.

शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाही, मात्र नारायण राणेंनी ते शक्य करून दाखवलं: दीपक केसरकर
Priyanka Gandhi: पीएम मोदींनंतर प्रियंका गांधींची पुण्यात होणार मोठी सभा, ४ लोकसभा मतदारसंघांचा करणार दौरा

ते म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाहीत. मात्र नारायण राणे यांनी स्वतः सह ११ आमदारांचे राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवले. यातून राणेंनी कोकणावर आणि महाराष्ट्रावर किती पकड आहे हे दाखवून दिलं.

शरद पवार यांना लक्ष्य करत दीपक केसरकर म्हणाले, ''२०१४ मध्ये मागितलं नसताना देखील सरकारला शरद पवारांनी पाठिंबा दिला आणि शिवसेनेची ताकद संपवली. २०१७ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची बोलणी केली. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली तरी चालले, मात्र शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये राहील, असं सांगितलं. मात्र शरद पवारांनी शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, इतका द्वेष ते शिवसेनेचे करत होते. चार चार वेळा शरद पवार यांनी शिवसेना फोडली.''

शिवसेना सोडून गेलेले नेते पुन्हा आमदार झाले नाही, मात्र नारायण राणेंनी ते शक्य करून दाखवलं: दीपक केसरकर
Sharad Pawar News: घटनेला धक्का लावणाऱ्यांना विरोध करु; स्वस्थ बसणार नाही.. शरद पवारांचा मोदी- शहांवर हल्लाबोल!

२०१९ ला काठावर सरकार आलं. तेव्हा राज्यांत राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवारांचा हात होता, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. तर एक प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय दुसरा प्रादेशिक पक्ष वाढत नाही, हे समीकरण शरद पवारांनी महाराष्ट्रात राबवलं. मात्र उद्धव ठाकरे त्यांची लाचारी करतात हे योग्य नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com