Bachchu Kadu On Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Bacchu Kadu: 'राज्याचा सातबारा नावावर आहे का?' बच्चू कडूंचा संजय राऊत, रोहित पवारांवर प्रतिहल्ला; २८८ जागा लढवण्याचीही घोषणा!

Bachchu Kadu On Assembly Election 2024: तिसऱ्या आघाडीचा फायदा काँग्रेसला होईल की भाजपला हे तुम्ही कसं ठरवले? अभ्यास न करता बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही, संजय राऊतांनी सांभाळून बोलावं, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदगर|ता. २० सप्टेंबर

Bacchu Kadu Criticizes Sanjay Raut Rohit Pawar: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे निवडणुकांच्या दृष्टीने महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू, ‘स्वाभिमानी शेतकरी’ संघटनेचे राजू शेट्टी तसेच ‘स्वराज्य’ संघटनेचे संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीचे आव्हान उभे केले आहे. छत्रपती संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’आघाडीची घोषणा केली. यावरुनच बोलताना संजय राऊत यांनी तिसरी आघाडी नेहमी भाजपला मदत करते, असे विधान केले होते. राऊत यांच्या या विधानावरुन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

"संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करतात, जेंव्हा काँग्रेस आणि भाजप लढत होती तेंव्हा शिवसेना तीसरीच होती, तेव्हा शिवसेना पैशांसाठी लढत होती का? महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर यांचं नाव आहे क? मी एकटा लढलो, पैशांसाठी लढलो का? कसा निवडून आलो ते संजय राऊतला माहीत नाही, काढली जीभ लावली टाळूला असे बोलू नये.. एका समजदार नेत्याने असे बोलणे उचित नाही, तुमच्यासोबत आलो असतो तर चांगला असतो. तिसऱ्या आघाडीचा फायदा काँग्रेसला होईल की भाजपला हे तुम्ही कसं ठरवले? अभ्यास न करता बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही, संजय राऊतांनी सांभाळून बोलावे, "असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

२८८ जागा लढवण्याची घोषणा...

"आम्ही लढूच नये असे रोहित पवारांना वाटतंय का? आम्ही संघर्षातून आलोय म्हणजे फक्त सतरंज्या उचलायच्या का? आम्ही दुसरे आहोत की तिसरे हे मतदार ठरवतील. राष्ट्रवादीची सत्ता राज्यात आणि केंद्रातही होती. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू झाल्या नाहीत? तुम्ही मुस्लिमांना आरक्षण का दिलं नाही? मुस्लिमांची मते घेतली मात्र आरक्षण नाही देता आले, तुम्ही केलं नाही म्हणून आम्हाला उतरावं लागतंय. आम्ही सर्व 288 जागा लढवणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराज कुठे जातील? ते आमच्याकडेच येतील," असा दावाही बच्चू कडू यांनी केला.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू, मी माझ्या मतदारसंघात तिसरा पक्ष म्हणून निवडून आलो, यांचं ऐकलं असतं तर मी आमदार झालो असतो का? राष्ट्रवादी किंवा भाजपासोबत रहावे असे यांना वाटते, महाराष्ट्र यांच्या बापाचा आहे का? असे म्हणत बच्चू कडू यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT