फैय्याज शेख
वाडा (पालघर) : सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून तरुणांकडून गैरवापर केला जात होता. यावरून एका मुलीशी ओळख करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्यास सुरवात केली. याबाबत पोलिसात दाखल तक्रारीवरून ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी सिन्नरमधून अटक केली आहे.
पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीला इंस्टाग्रामवरून फेक आयडी बनवून त्यावर दुसऱ्या चार फोटो लावत रिक्वेस्ट पाठविली. यानंतर सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चांगली ओळख झाल्यानंतर तिच्याकडून फोटो व काही व्हिडीओ मागवले. तेच फोटो व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडून आणखीन नग्न फोटो व व्हीडीओ मागविले. यानंतर तिला (Crime news) तरुणांकडून ब्लॅकमेल केले जात होते.
सिन्नरमधून तरुणाला अटक
दरम्यान सदर प्रकाराबाबत तक्रार वाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपास पथक तयार करून आरोपी प्रेम राजेश सोनी याला सिन्नर येथून अटक केली आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याकडून तपास केला असता त्यांने सर्व फोटो व व्हीडीओ इतर कोणाला तरी पाठवले असल्याची कबुली दिली आहे. तर आणखी किती मुलींना फसवले आहे का? याचा तपास वाडा पोलिस करत आहे. तरुणींना इंस्टाग्राम वापर पासून सावधान रहाण्याचे आव्हान केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.