Sanjay Raut on Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'शरद पवारांकडे चुकीची माहिती, आमची २८८ जागांची तयारी', उमेदवारीवरुन संजय राऊत स्पष्टचं बोलले!

Sanjay Raut On Assembly Election 2024: लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार आहे,' असे म्हणत संजय राऊत यांनी सिनेट निवडणुकांवरुन शिंदे सरकारवर तोफ डागली. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २२ सप्टेंबर

Sanjay Raut MVA Seat Formula: 'या राज्यात निवडणुका घ्यायचाच नाहीत हे धोरण मिंधे सरकारने अवलंबलेलं आहे, कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील. जिथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही जिथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही अशा ठिकाणी मिंधे असतील फडणवीस असतील किंवा अजित दादा असतील हे निवडणुका घेण्यास घाबरतात. लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार आहे,' असे म्हणत संजय राऊत यांनी सिनेट निवडणुकांवरुन शिंदे सरकारवर तोफ डागली. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"निवडणुकीला 24 तास असताना सिनेटची निवडणूक आपण शंभर टक्के हरणार असं समजल्यावर निवडणूक रद्द केली. मुंबईच्या उच्च न्यायालयाने त्यांना चपराक लावली आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. मी असा ऐकतोय मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरू किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठावर बसलेले आहेत त्यांच्या मदरबोर्डाचा हा दबाव आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सिनेट निवडणुका शिवसेना जिंकेल...

"मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका पार पडतील आणि सर्वच्या सर्व जागा शिवसेनेचे म्हणजेच युवा सेनेचे आमचे सर्व लोक जिंकतील याच्याबाबत आमच्या मनात शंका नाही. अशाच पद्धतीने यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, १4 महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत देखील कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा," अशी मागणीही संजय राऊत यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोगावर टीका..

"निवडणूक आयोग दौरा करतात. या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड सोबत घ्यायला हरकत नव्हती. जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही चार राज्यांच्या निवडणुका का एकत्र घेऊ शकत नाहीत? आता ऑब्झर्वर येतील पडद्याआड राजकीय चर्चा होतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणूक हव्यात जे शेड्युल हवेत ते ठरवतील बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं वाटत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

शरद पवारांकडे चुकीची माहिती..

"श्रीगोंद्याच्या जागा वाटपाबाबत शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. प्रत्येक घटक पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो. 288 मतदारसंघात आमची तयारी आहे. काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना एक संदेश असतो की आपण तयारी करा. श्रीगोंदाच्या बाबतीत काय घडतंय माहित नाही, श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल हे मला माहिती आहे. कोणी कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT