Beed Accident : बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर फाटा या ठिकाणी लातूर -बीड महामार्गावर कार आणि कंटनेरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील जगळपुर येथील 3 जण आणि इतर 1 अशा चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतामध्ये बाबूराव खलंगरे यांच्यासह आत्माराम बानापुरे आणि सौदागर कांबळे व इतर एक यांचा समावेश आहे.
रात्री लातूर वरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते . मुसळधार पावसात रात्री 2 वाजता हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. तर अधिकचा तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.
नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा जागीच चुराडा झालाय. भीषण अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहा. फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
रात्री उशीरा जगलपूर येथील 4 जण स्विफ्ट कार क्र. एमएच 24 एएस 6334 ने औरंगाबादला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनर क्र. एमएच 12 एमव्ही 7188 ची जोरदार धडक झाली. यादरम्यान कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
मिळाल्या माहितीनुसार, शनिवारपासून बीड आणि लातूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसात लातूरहून काही जण कारने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. त्यावेळी लाचकाला समोरुन येणाऱ्या वाहनाचा अदाजं आला नाही, त्यामुळे समोरासमोर धडक झाली.
लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आलाय. अचानक निमुळता झालेल्या या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यात रविवारी पहाटे आणखी एक भर पडली. पहाटे झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची नोंद आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.