Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'एक पाऊल मागे...', काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वादावर संजय राऊत थेट बोलले!

Maharashtra Assembly Election 2024: झारखंडमध्येही काँग्रेस- मित्रपक्षांमध्ये मदभेद आहेत, त्यामुळे गांभीर्याने पाहू नका, आम्हाला एकत्र निवडणूक लढायची आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई

Sanjay Raut On MVA Seat Sharing Formula: महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कोणतेही वाद नाहीत. त्यामुळे जागा वाटपावरुन एक पाऊल मागे किंवा पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सर्वजण एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मविआच्या जागा वाटपावरुन महत्वाचे विधान केले आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"काँग्रेस नेत्यांचे सर्व निर्णय दिल्लीत होतात. तो राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांच्या बैठका दिल्लीत होतात. राज्यातील नेते त्यांच्या हायकमांडला भेटतात. कोणताही भाग किंवा प्रदेश एखाद्या पक्षाचा नसतो. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे काँग्रेस आणि आमच्यात विदर्भाच्या जागेवरुन फार मतभेद नाहीत. एखाद्या जागेवरुन वाद असेल, त्यातून मार्ग काढावा लागतो.आज संध्याकाळपर्यंत वाद मिटेल. आज संध्याकाळपर्यंत कदाचित यादीही जाहीर करु..." असे संजय राऊत म्हणाले.

"भाजपने पहिली यादी जाहीर केली म्हणजे काही तीर मारला नाही. जे त्यांचे विद्यमान आमदार आहेत, त्यांचीच नावे जाहीर केलीत. यामध्ये कोणतेही गुदगुल्या होण्याचे कारण नाही. शरद पवार आणि आमच्यामध्ये सेना- राष्ट्रवादीच्या जागा वाटपात संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे आम्ही भेटायला गेलो होतो. काँग्रेस हायकमांड ही नेहमी समंजस भूमिका घेणारी संस्था आहे. झारखंडमध्येही काँग्रेस- मित्रपक्षांमध्ये मदभेद आहेत, त्यामुळे गांभीर्याने पाहू नका, आम्हाला एकत्र निवडणूक लढायची आहे," असंही संजय राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राममंदिराच्या निकालाबाबत केलेल्या विधानावरुनही संजय राऊतांनी जोरदार टीका केली. "धनंजय चंद्रचूड हे संविधानावर अवलंबून नसून ते त्यांना साक्षात्कार होईल, असे निर्णय देतात की काय? शिवसेनेला न्याय मिळू नये, अशी ईश्वराची इच्छा नसेल. विष्णूच्या १३ व्या अवताराची असेल आणि त्या अवताराने जर त्यांना काही साक्षात्कार दिला असेल. म्हणून जर आमचा निकाल विधानसभेची मुदत संपल्यानंतरही लागणार नसेल. तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार आहे, कारण ते विष्णूचे १३ वे अवतार आहेत," असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT