Santosh Bangar News: आचारसंहितेचा पहिला दणका! 'फोन पे' प्रकरण अंगलट आलं, शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

Violation of the Code of Conduct: प्रचार जोर धरत असतानाच आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिंदें गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Santosh Bangar News: आचारसंहितेचा पहिला दणका! 'फोन पे' प्रकरण अंगलट आलं, शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल
Santosh Bangar NewsSaamtv
Published On

Maharashtra Assembly Election 2024: आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे वाटण्याचे आमिष दिले होते, याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींची घोषणा केली. एकीकडे निवडणुकांसाठी प्रचार जोर धरत असतानाच आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिंदें गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच हिंगोलीच्या कळमनुरी शहरात संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना फोन पे द्वारे पैसे पाठवतो असे विधान केले होते. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संतोष बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Santosh Bangar News: आचारसंहितेचा पहिला दणका! 'फोन पे' प्रकरण अंगलट आलं, शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल
Maharashtra Politics : आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मविआत खळबळ?

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बोलताना संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे पाठवण्याचे विधान केले होते. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची यादी दोन दिवसात आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागेल ते सांगा, तसं फोन पे करा, असे संतोष बांगर म्हणाले होते. यावरुनच निवडणूक आयोगाने त्यांना मोठा दणका दिला आहे.

दुसरीकडे पुण्यात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावरही आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी किट आणि पैशांचे पाकीट वाटप करत रविंद्र धंगेकर यांच्याकडून आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून धंगेकरांची चौकशी झाली. ज्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Santosh Bangar News: आचारसंहितेचा पहिला दणका! 'फोन पे' प्रकरण अंगलट आलं, शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल
Terrorist Attack: जम्मू-काश्मिरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला! कामगारांच्या तळावर अंधाधुंद गोळीबार, डॉक्टरसह ७ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com