Santosh Bangar: 'मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा...', शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; कारवाईची मागणी
Santosh Bangar NewsSaamtv

Santosh Bangar: 'मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा...', शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; कारवाईची मागणी

MLA Santosh Bangar Controversial Statement: निवडणुकांच्या प्रचार तोफा धडाडायला सुरुवात झाली असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विधानाने नवा वाद उभा राहिला आहे.
Published on

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. निवडणुकांच्या प्रचार तोफा धडाडायला सुरुवात झाली असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी गाड्या करा, फोन पे करा.. असे खळबळजनक विधान संतोष बांगर यांनी केले आहे.

Santosh Bangar: 'मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा...', शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; कारवाईची मागणी
Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

शिवसेना शिंदे गटाचे नेते, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. संतोष बांगर यांनी विधानसभा निवडणुकांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. परगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आणायला गाड्या करा, फोन पे करा असे ते म्हणालेत. संतोष बांगर यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले की, बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची यादी दोन दिवसात आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काल लागेल ते सांगा,तसं फोन पे करा. दरम्यान, संतोष बांगर हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत यायची पहिली वेळ नाही. याआधीही सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ केल्यामुळे तर मारहाण केल्यामुळेही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे आता या विधानावर निवडणूक आयोग काय करवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Santosh Bangar: 'मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा...', शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; कारवाईची मागणी
Andheri Crime News: सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; व्यवसायिकाला लाखोंचा गंडा, अंधेरी पोलिसांकडून दोघांना अटक

दुसरीकडे हिंगोली विधानसभेबाबत केलेल्या वक्तव्यावरुनही महायुतीत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. हिंगोलीच्या तिन्ही विधानसभेत सी टिंग आमदार राहणार, असे महत्वाचे विधान संतोष बांगर यांनी केले आहे. बांगर यांच्या या दाव्यामुळे हिंगोलीसह वसमत विधानसभेतील भाजप , शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

Santosh Bangar: 'मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा...', शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; कारवाईची मागणी
Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com