Maharashtra Politics : आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मविआत खळबळ?

Sanjay Raut News : आज नक्कीच निर्णय भूमिका घेतली जाऊ शकते, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेय.
आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मविआत खळबळ?
आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मविआत खळबळ?mint
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी समोर येत आहे. मविआमधील वाद आता शिगेला पोहचल्याचं दिसतेय. सूत्रांच्या महितीनुसार, उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. ठाकरे राज्यातील २८८ जागा लढण्याची शक्यताही आहे. मविआमधील जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर आलाय.

विदर्भ आणि नाशिकमधील जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे आमनेसामने आलेत. उद्धव ठाकरे आज मोठा निर्णय घेतील, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी मातोश्रीवरील बैठकीला जाताना दिलाय. आज नक्कीच निर्णय भूमिका घेतली जाऊ शकते,असे संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जागावाटपावर तिढा, मविआत वादाचे फटाके

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली, तरीही अद्याप मविआचे जागावाटप अद्याप पूर्ण झाले नाहीत. विदर्भात आणि नाशिकमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकाच जागेवर दावा ठोकलाय. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद ताणला गेलाय. संजय राऊत आणि नाना पटोले यांचा वाद दिल्लीपर्यंत पोहचल्याचं समजतेय. आज दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्याची महत्वाची बैठक होणार आहे.

सांगलीप्रमाणे निर्णय घेऊ नये, अशी राज्यातील काँग्रेस नेत्याची इच्छा आहे. तर ठाकरे गटही विदर्भातील १५ जागांवर आग्रही आहेत. त्यामुळे वाद टोकाला गेला आहे. आज ठाकरे काय निर्णय घेतात? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. यामध्ये महत्वाच्या विषयावर निर्णय घेणार असल्याचे समजतेय.

आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मविआत खळबळ?
Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार? मातोश्रीवर तातडीची बैठक, आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीसाठी रवाना

राऊतांचे सूचक विधान अन् चर्चेला उधाण -

आज नक्कीच निर्णय भूमिका घेतली जाऊ शकते, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेय. आम्ही अजिबात नाराज नाही, नाराजी कळवण्याचा देखील प्रश्न येत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, असे संजय राऊत म्हणाले.

आम्ही कोणाला का नाराजी कळवायची? आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो चर्चांना उपस्थित राहतो . आम्हाला भाजपच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे. आम्ही यांच्याशी संघर्ष केला, तुरुंगात गेलो आमच्या मुलांवर कुटुंबावर ईडीचे हल्ले झाले आमचे घरदार जप्त केली तरी आम्ही लढत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

आम्हाला आमचे निर्णय घेता येतात, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मविआत खळबळ?
Maharashtra Politics : लुडबुड करून भांडण लावू, अजितदादांचा आमदार भाजपवर भडकला, महायुतीचा वाद चव्हाट्यावर!

आतले आजार, निर्णायक निर्णय घेऊ

भाजपची कसं लढायचं आम्हाला माहिती आहे. मविआची तब्येत चांगली आहे, त्याविषयी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आज एक्स-रे MRI करू. काही आतले आजार असतात ते वरून दिसत नाहीत. आज काही निर्णायक भूमिका घेऊ शकतात का ते पाहू, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com