Maharashtra Assembly Election 2024 : लुडबुड करून भांडण लावू नका, असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावलेय. पुणे जिल्ह्यातील महायुतीची खदखद पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. पुण्यात या राजकीय वादावादीची चर्चा सुरु आहे.
पक्ष एकसंध कसा राहील हे भाजपाच्या नेत्यांनी पाहावं, आमच्यात लुडबुड करून भांडण लावू नयेत. महायुतीत तेढ निर्माण करण्याच काम भाजपममधील काही पदाधिकारी करत आहेत, असे वक्तव्य सुनील शेळके यांनी केलेय. त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. शेळके यांनी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यानंतर फोनद्वारे त्यांच्याशी संवाद झाला. अजित पवारांना समक्ष भेटलो आहे. भाजप मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एकसंध कसा ठेवता येईल हे पाहावं. आमच्याकडे येऊन लुडबुड करायची आणि भांडण लावायचे हे उपदव्याप करू नये, असे शेळकेंनी खडसावले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचे आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. तालुका आणि प्रदेशकार्यकारणी यांच्यात समन्वयक होत नाही. तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका अस म्हटलं आहे.मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेते किंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत. वेगळी स्टेटर्जी करत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत. मला आनंद आहे की राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि प्रांतिक पक्ष ठाकरेंची शिवसेना, शरद पवार गट स्वतः चं चिन्ह घेऊन मावळ विधानसभेत उतरू शकत नाही. याचा अर्थ महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे, असे आमदार शेळके म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.