Tukaram Munde Ashok khemka  Saamtv
महाराष्ट्र

IAS Officer Transfer: ३० वर्ष अन् ५५ बदल्या! 'हे' आहेत सर्वाधिक ट्रान्सफर होणारे IAS अधिकारी; तुकाराम मुंडेंपेक्षाही धडाकेबाज कामगिरी...

Most Transferred IAS Officer: तुकाराम मुंढेंपेक्षाही सर्वाधिक बदले झालेले अधिकारी हरियाणामध्ये आहेत.

Gangappa Pujari

Maharashtra IAS Transfer News : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे....

तुकाराम मुंढे ( IAS Tukaram Munde) हे डॅशिंग प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. अत्यंत शिस्तप्रिय आणि कायद्याने वागणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची खास ओळख आहे. तुकाराम मुंडे सनदी अधिकारी झाल्यापासून एका पदावर जास्त काळ राहिले नाहीत. त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २१ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळेच सर्वाधिक वेळा बदली झालेले अधिकारी अशी त्यांची खास ओळख आहे.

IAS अशोक खेमका...

मात्र तुम्हाला माहित नसेल. तुकाराम मुंढेंपेक्षाही सर्वाधिक बदले झालेले अधिकारी हरियाणामध्ये आहेत. हरियाणामध्ये IAS अशोक खेमका (Ashok Khemka) चर्चेत असणारे सनदी अधिकारी आहेत. ते सध्या मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात काम पाहतात. महाराष्ट्रातील तुकाराम मुंडेप्रमाणे अशोक खेमका हे देखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्याही सततच्या बदल्यांमुळे ते चर्चेत येत असतात. गेल्या 30 वर्षात अशोक खेमका यांची ही 55 वेळा बदली जाली आहे. त्यांची अखेरची बदली जानेवारी 2023 मध्ये झाली होती. (Latest Marathi News)

कोण आहेत अशोक खेमका...

अशोक खेमका (Ashok Khemka) हे सनदी अधिकारी आहेत. ते 1991 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. बदल्यांसाठी ओळखले जाणारे अशोक खेमका हे निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप कासनी यांच्यानंतर हरियाणातील दुसरे सर्वाधिक बदली झालेले अधिकारी आहेत.

2012 साली हरियाणामध्ये हुड्डा सरकार असताना सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे जावई रॉबर्ट वॉड्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या दरम्यान झालेल्या जमीन व्यवहाराचा करार त्यांनी रद्द केला होता. तेव्हापासून खेमका यांची देशभरात चर्चा झाली. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार आणि हरियाणात देखील काँग्रेच सरकार होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT