SSC Result 2023: कोल्हापुरकरांचा विषय हार्ड! १० वी पास झाल्यानंतर चक्क उंटावरुन मिरवणूक; हटके सेलिब्रेशनची तुफान चर्चा...

Camel procession After 10th Pass: कोणताही आनंद द्विगुणीत करण्याचं कोल्हापूरकरांचे वेगळं तंत्र आहे. आज निकाल लागल्यानंतर ही कोल्हापुरात हेच चित्र पाहायला मिळाले.
Kolhapur News
Kolhapur NewsSaamtv
Published On

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

निकालानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा जल्लोश पाहायला करताना पाहायला मिळत आहे. मात्र, सर्वात जास्त चर्चा होतेय ती कोल्हापूरकरांच्या हटके सेलिब्रेशनची. कारण कोल्हापूरमध्ये १० वी पास झालेल्या एका मुलाची त्याच्या मित्रांकडून चक्क उंटावरुन मिरवणूक काढण्यात आली आहे.

Kolhapur News
IAS Officer Transfer: मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं खातं, राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

१० वीच्या निकालानंतर जल्लोश...

आज दहावीचा निकाल जाहीर झाला आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मित्रासाठी कायपण म्हणत दहावीत उत्तीर्ण झालेल्या कोल्हापुरातील समर्थ सागर जाधव याची मित्रांनी चक्क उंटावरून मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

थेट उंटावरुन काढली मिरवणूक...

कोल्हापुरातील (Kolhapur) गंगावेश परिसरात राहणारा समर्थ सागर जाधव हा एस. एम लोहिया शाळेचा विद्यार्थी. दहावीचे वर्ष असल्यामुळे घरातून आणि मित्रांकडून वारंवार अभ्यास कर अशा सूचना मिळत होत्या. मात्र या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करत आपल्याच समर्थ मात्र त्याच्याच नादात असायचा. त्यामुळे त्याच्या मित्र आणि सवंगड्यांमध्येही तो दहावी तर पास होतो का याबाबत शंकाच होती.

Kolhapur News
Nanded Crime News: वरातीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

कोल्हापूरकरांचा जल्लोश...

मात्र आज दहावीचा निकाल लागला आणि समर्थच्या कुटुंबीयांसह मित्रांनी ही गुलालाची उधळण करत जल्लोष केला. समर्थला दहावी पास होणार नाहीस, असं मित्रांनी चिडवले होते. मात्र निकालानंतर 51% गुणांसह समर्थ दहावी पास झाल्याचे समजतात मित्रांनी कोल्हापुरातील गंगावेश ते रंकाळा टॉवर या मार्गावर समर्थची चक्क उंटावरून मिरवणूक काढून आनंद साजरा केला.

कोणताही आनंद द्विगुणीत करण्याचं कोल्हापूरकरांचे वेगळं तंत्र आहे, आज दहावीचा निकाल लागल्यानंतर ही कोल्हापुरात अनेक ठिकाणी रंगपंचमी साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील गल्ली आणि पेटा- पेठांमध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत डॉल्बीवर ठेका धरला. एकूणच कोल्हापुरात दहावीच्या निकालानंतर अनोखे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com