Rupali Chakankar Ashok Kharat case 
महाराष्ट्र

Rupali Chakankar controversy : रूपाली चाकणकर काळी जादू करायच्या, अनामिका कापली; सुषमा अंधारेंनी सांगितलं सोमवती 'अमावस्या' कनेक्शन

Ashok kharat Rupali Chakankar controversy : सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अघोरी विधी आणि खरात प्रकरणातील संबंधांबाबत गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Akshay Badve

Sushma Andhare allegations on Rupali Chakankar Ashok Kharat case : शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपी खरात आणि चाकणकर यांचे संबंध नेमके काय आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे. अंधारे यांनी केवळ राजकीय आरोप न करता, यात काही 'अघोरी' किंवा संशयास्पद विधी झाल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे. अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या या दाव्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांच्याशी असलेला संपर्क फक्त ट्रस्ट पर्यंतचा होता तर हातावर मेहंदी असलेला फोटो कुठून आला? यासोबतच चाकणकर यांचा एक फोटो आहे जिथे त्यांची करंगळी कापली आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये बँडेज दिसत आहे. त्याचा आम्ही शोध घेतला तेव्हा तो २ सप्टेंबर २०२४ असलेल्या सोमवती अमावस्या दिवशीचा आहे. याचा अर्थ त्या स्वतः काळी जादूटोणा करतात असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अनामिका जीव नाडी आहे असं म्हणतात आणि मग सूर्य आणि शुक्राचा प्रभाव मिळण्यासाठी असे विधी करताना दिसतात त्यामुळे हा सगळा त्यातला प्रकार असल्याचं आणि हे फोटो दाखवत सुषमा अंधारे यांनी आरोप केलेत. चाकणकर यांचा सी डी आर तपासला जायला पाहिजे, तसंच त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

चाकणकर यांच्या फोटोमध्ये दिसणारी ही काही किचनमध्ये काम करताना झालेली जखम नाही. इतके दिवस ही जखम राहत नाही. २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या होती. अनामिका ही जीव नाडी मानली जाते. सूर्य आणि शुक्राचा प्रभाव मिळवण्यासाठी असे विधी केले जातात, असं म्हटलं जातं. मग हा योगायोग आहे की काही विधी?
सुषमा अंधारे

जर आरोपीचा संपर्क फक्त ट्रस्टपुरता होता, तर वैयक्तिक फोटो कुठून आले? चाकणकर आणि आरोपी खरात यांचे CDR (कॉल रेकॉर्ड) तपासावेत. या प्रकरणात केवळ पोलीसच नाही, तर ED आणि आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) देखील लक्ष घालावे. खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणीही अंधारे यांनी यावेळी केली. रूपाली चाकणकर यांना त्यांच्या पदावरून तात्काळ दूर करण्यात यावे. त्यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी.त्या फरार होण्याची शक्यता अंधारे यांनी व्यक्त केली.

या प्रकरणावर बोलल्यामुळे आज सकाळपासून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. या सर्व नंबरची आपण पोलिसांत तक्रार करणार असून, पीडित महिलांना सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता या प्रकरणात सुनेत्रा पवार यांनी हस्तक्षेप करून कारवाई करावी, असे आवाहन अंधारे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT