Rupali Chakankar faces mounting pressure as the Ashok Kharat case continues to impact Maharashtra politics. saam tv
महाराष्ट्र

Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरण भोवलं! रुपाली चाकणकरांची उचलबांगडी होणार? सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रूपाली चाकणकरांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला प्रदेशाध्यक्ष पद जाणार असल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर अडचणीत

  • महिला आयोग अध्यक्षपदाचा आधीच राजीनामा दिला

  • राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्याची शक्यता

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. त्यापैकी एक रुपाली चाकणकर या सुद्धा होत्या. चाकणकर यांचे अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

खरात प्रकरणामुळे चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर निवेदन देणार आहेत. त्याआधी सुनेत्रा पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीचे कारण आहे, याचा तपशील अद्याप समोर आला नाहीये. या बैठकीत अशोक खरात प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरातशी असलेल्या संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणारी बदनामी कशी थांबवायची, याबाबत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती.

या बैठकीतून रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिल्याचीही कुजबुज राजकीय वर्तुळात होती. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी, 'कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हापासूनच रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होईल, अशी चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinks to lower cholesterol: नसांमध्ये जमलेलं घाण कोलेस्ट्रॉल लगेच पडेल बाहेर; हे ४ घरगुती ड्रिंक्स करा ट्राय

Maharashtra News Live Update: कसारा रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून निघाला धूर

Gold And Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या दिवसाअखेरचे दर

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

'देऊळ बंद 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! अभिनेत्री स्नेहल तरडेने शेअर केले सेटवरचे 'Unseen' फोटो

SCROLL FOR NEXT