satara, police, ashadhi wari 2022, warkari saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022 : वारकरी वेषातील सातारा पोलिसांची वारीत दमदार कामगिरी

सातारा जिल्ह्यात पालखी साेहळ्यात विविध ठिकाणचे भाविक सहभागी झाले आहेत.

ओंकार कदम

सातारा : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala) फलटण (phaltan) नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत झाले. माऊलींचा मुक्काम फलटण शहरातील विमानतळ मैदानावर असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वारकऱ्यांच्या वेषात फिरणाऱ्या तसेच संशयित रित्या फिरणाऱ्या चोरट्यांना लक्ष करून कारवाई करण्याचे काम केले. विशेष म्हणजे सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे (lcb) सर्व कर्मचारी हे या ठिकाणी वारकरी वेशातच पाहायला मिळाले. वारकरी वेषात पोलिसांनी लोणंद पासून फलटणपर्यंत 44 चोरटे पकडले. यामध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. (ashadhi wari 2022 marathi news)

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम यंदा सातारा जिल्ह्यात सहा दिवस आहे. आज सकाळच्या सुमारस पालखी साेहळा फलटणहून बरड येथे मार्गस्थ झाला. या मुक्काच्या कालावधीत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा आराेग्य विभागातर्फे विविध पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जाग्यावरच औषधोपचार केले जात आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारक-यांचे माैल्यवान साहित्य चाेरीस जाऊ नये, विविध ठिकाणी हाेणा-या छाेट्या आणि माेठ्या चाे-या राेखण्यासाठी सातारा पाेलीस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस वारकऱ्यांच्या वेषात पालखी साेहळ्यात फिरत आहेत. संबंधित पाेलीस संशयित रित्या फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवतात. त्यानंतर पाेलीस संबंधिताची चाैकशी करुन त्याच्याकडील असलेले साहित्याबाबत विचारण करताना त्यांना काही शंका आल्यास त्यास पाेलीसी खाक्या दाखविला जाताे. त्यातून 44 चाेरटे पाेलीसांनी जेरबंद केले.

वाहतुकीत बादल

नातेपुतेकडून फलटण तसेच फलटण ते नातेपुते दिशेने होणारी सर्व वाहतुक बंद आहे. फलटण ते लोणंद, फलटण ते दहिवडी , फलटण ते सातारा वाहतुक चालू आहे असे सातारा पाेलीस दलाने कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT