Ashadhi Wari 2025  x
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीतील दिंड्यांसाठी सरकारकडून २,२१,८०,००० रुपयांचे अनुदान, प्रत्येक दिंडीला मिळणार २० हजारांचे अनुदान

Ashadhi Wari : आषाढी एकादशी वारीतील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यात्रेतील दहा मानाच्या पालख्यांसह वारीत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक दिंडीला प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

Yash Shirke

पुणे : आषाढी एकादशी यात्रा २०२५ साठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मानाच्या दहा पालख्यांसोबत वारीत सहभागी होणाऱ्या ११०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचे अनुदानाची मान्यता मिळाली आहे.

मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये देखील अशीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्या वेळी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून ११०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती आणि त्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीदेखील तितक्याच प्रमाणात निधी वितरित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित बैठकीत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनीही आषाढी वारीच्या सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

प्रशासनाकडून यात्रेच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात येत आहे. दिंडीतील वारकऱ्यांसाठी आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे. त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व आरोग्यसुविधांची सोय करण्यासाठी यंदा देखील अनुदानाचा वापर केला जाणार आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT