
WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा जिंकली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहास रचला आहे. या विजयानंतर आफ्रिकेच्या संघाने २७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर धनाचा वर्षाव झाला आहे.
ICC WTC Final 2025 Prize Money Breakdown -
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची एकूण बक्षीसाची रक्कम ५.७६ मिलियन डॉलर्स इतकी आहे. थोडक्यात विजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ५.७६ मिलियन डॉलर्स म्हणजेच ४९ कोटी, २६ लाख, ८१ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम यापूर्वीच्या दोन पर्वाच्या अंतिम सामन्याच्या बक्षीस रकमेच्या दुप्पट आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजेतेपदासह ३.६ मिलियन डॉलर्स (अंदाजे ३१ कोटी) बक्षीसाची रक्कम जिंकली आहे. मागच्या दोन पर्वातल्या विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला, उपविजेता संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला २.१६ मिलियन डॉलर्स म्हणजेच १८ कोटी, ४७ लाख, ५५ हजार, ६०० रुपये बक्षीसाची रक्कम मिळाली आहे.
कसोटी संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिका पहिल्या, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या संघाला १२ कोटी ३१ लाख ९० हजार इतकी रक्कम मिळणार आहे. चौथ्या स्थानावर असणाऱ्या न्यूझीलंडला १०.३५ कोटी, तर पाचव्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंडच्या ८.२८ कोटी रुपये मिळणार आहेत. यादीत सर्वात खालच्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानला ४.१४ कोटी मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.