Sangli Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Accident: जबलपूरजवळ सैन्य दलाच्या वाहनाला अपघात; सांगलीतील पॅरा कमांडोचा मृत्यू

Sangli Accident: सैन्य दलाच्या वाहनाला टँकरने मागून धडक दिल्याने अपघात झालाय.

विजय पाटील

Jabalpur Army Vehicle Accident Sangli Jawan Dead :

जबलपूरहून बेंगळुरूकडे येणाऱ्या सैन्य दलाच्या वाहनाला अपघात झालाय. मागून येणाऱ्या एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात एक जवान ठार झाला तर एक गंभीर जखमी झालाय. अपघाताची घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. मृत झालेला जवान सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आहेत. (Latest News)

पोपट भगवान खोत, असं या जवानाचं नाव आहे. पोपट खोत पॅरा कमांडोचे हवालदार म्हणून कार्यरत होते. मृत्यूमुळे लोणारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आणि लष्कराने पोपट खोत आणि त्यांच्या सहकारी जवानाला रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान खोत यांचा मृत्यू झाला. खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोपट खोत हे ३४ वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, आई आणि बहिणी असा परिवार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणलं जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT