Gondia Accident: भीषण अपघात! अंधारात उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक; तिघांचा दुर्दैवी अंत

Gondia News: सदर अपघातात मृत झालेल्यांची ओळख अद्याप पटली नसुन देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.
Gondia Accident:
Gondia Accident:Saamtvnews
Published On

शुभम देशमुख, प्रतिनिधी

Gondia Truck Accident News:

गोंदियामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुरूस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. मंगळवारी (३१, ऑक्टोंबर) पहाटे देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील धोबीसराड गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोंदियातील (Gondia) धोबीसराड गावाजवळ मंगळवारी सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरालगत असलेल्या धोगीसराड गावाजवळ एक ट्रकमध्ये ( क्रमांक- MH 34 BG 5074) बिगाड झाल्याने दुरुस्तीसाठी महामार्गाच्या पलीकडे थांबला होता. रात्रीच्या अंधारातच या ट्रकची दुरूस्ती सुरू होती.

याचवेळी रायपुरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक - MH 16 CD 8777) या उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या (Accident) घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह देवरी पोलिसांनी घटानास्थळी धाव घेतली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia Accident:
Buldhana Crime News: मित्राच्या बायकोवर जीव जडला अन् जीवलग दोस्ताचा जीव घेतला; बुलढाण्यातील भयानक घटना

पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करत मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्नालयात शव विच्छेदनाकरीता पाठविले आहेत. सदर अपघातात मृत झालेल्यांची ओळख अद्याप पटली नसुन देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. या भीषण घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Gondia Accident:
Cabinet Decision : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय; बैठकीतील इतर निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com