Ahmednagar news Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी; परिसरात भीतीचं वातावरण

Robbery News In Ahmednagar : शेवगावच्या जैन गल्लीत पहाटेच्या वेळी ही सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे. गेल्या काही दिवसांपासून शेवगावमध्ये दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

गोपीकिशन बलदवा, पुष्पा बलदवा अशी मृतांची नावं. तर सुनीता बलदवा या गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव शहरातील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिश बलदवा यांच्या शेवगाव शहरातील बाजारपेठेमधील राहत्या घरावर रात्री 3 ते 4च्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकला.

त्यामध्ये गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलदवा या दोघांचा दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्याचबरोबर सुनिता गोपीकिशन बलदवा या घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत. (Crime News)

दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बलदावा कुटुंबियांना लोखंडी सळई साहाय्याने मारहाण केल्याचं इतर जखमी सदस्यांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात घबराट पसरली आहे.  (Latest Marathi News)

घटनास्थळावर व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. शेवगावमध्ये झालेल्या दरोड्याच्या निषेधार्थ शेवगाव शहरातील सर्व व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने शेवगाव बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT