Vinesh Phogat story X Account
महाराष्ट्र

Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाट अपात्र, पुण्यातील काका पवारांच्या डोळ्यांत अश्रू; म्हणाले, षडयंत्र...,

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपात्र ठरली आहे. त्यामुळे आता देशात मोठं गोंधळाचं वातावरण आहे. विविध ठिकाणांहून याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पुण्यातून देखील कुस्तीपटू प्रशिक्षक काका पवार यांनी सामटीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाट यांच्या अपात्रतेबाबत निर्णय येताच काका पवारांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

विनेश फोगाट अपात्र

विनेश फोगाटने ५० किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करत ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलंय. ही बातमी कळताच अर्जुन पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध कुस्तीपटू प्रशिक्षक काका पवार ( Wrestler Coach Kaka Pawar) यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. या संपूर्ण प्रकरणात कुठलेही षडयंत्र नाहीये. नियमासमोर कोणी नसते, अशी प्रतिक्रिया यावेळी काका पवार यांनी व्यक्त केलीय. मात्र भारताने सुवर्ण पदक गमावले, ही भावना व्यक्त करताना काका पवार भावूक झाले होते.

काका पवार कोण आहेत?

काका पवार हे एक प्रसिद्ध कुस्तीपटू आहेत. ते मूळचे पुण्यातील आहेत. काका पवार यांनी देशाला तब्बल ३१ आंतरराष्ट्रीय पदके मिळवून दिली होती. त्यांना केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे. कुस्ती निवृत्तीनंतर काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेतील पैलवान घडवले आहेत. एक उत्कृष्ट कुस्ती प्रशिक्षक म्हणून काका पवार याची एक विशेष ओळख (Vinesh Phogat) आहे.

ऑलिम्पिक विजेत्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम स्थगित

दुसऱ्या बाजूला, राष्ट्रीय प्रशिक्षक रणधीर सिंह यांनी तर विनेश फोगाट (Vinesh Phogat Disqualification) हिला कालच्या सामन्यानंतर अती आनंद झाला असेल, त्यामुळे कदाचित तिचं वजन वाढलं असावं, अशी शंका त्यांनी उपस्थितीत केलीय. वजन वाढल्याचं कारण देत विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलंय, त्यामुळं सर्व भारतीयांच्या आनंदावर विरजन पडलं आहे.

विनेश फोगाटला अपात्र केल्यामुळे ऑलिम्पिक विजेत्यांच्या अभिनंदनाचा नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आलाय. आज ऑलिम्पिक विजेते खेळाडू मनू भाकर, स्वप्नील कुसळे पुन्हा मायदेशी (Paris Olympic 2024) परतले. दुपारी अडीच वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या निवासस्थानी सर्वांचे अभिनंदन आणि जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना अपात्र ठरवण्याच्या बातमीनंतर आता हा कार्यक्रम स्थगित केला गेलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT