Anurag Thakur saam tv
महाराष्ट्र

Anurag Thakur : शिंदेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा करणार दौरा

Kalyan Lok Sabha Constituency: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे 14 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत.

Chandrakant Jagtap

>>अभिजीत देशमुख, कल्याण

Anurag Thakur In Kalyan Lok Sabha Constituency: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर 14 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या एकदिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या आहेत त्या जागा पूर्ण बळकट करण्याचं प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिंदे यांच्या सेनेमध्ये अतिशय अंडरस्टँडिंग आहे असेही ते म्हणाले.

याबाबात बोलताना केळकर म्हणाले की, लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या भाजपच्या दृष्टीने सक्षम व्हायलाच हव्या. अंतिम निर्णय केंद्र आणि राज्यातले पक्ष श्रेष्ठी घेत असतात. सक्षमपणे आपण लढलो पाहिजे आणि जिंकलो पाहिजे. कोण उभ राहणार, कोणाला सीट जाणार हा निर्णय नेतृत्व करेल असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

दरम्यान भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर जे मतदारसंघ याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत अशा राज्यातील १६ लोकसभा मतदार संघावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. 

प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या अधिक आहे. येत्या १४ तारखेला भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेचा एक दिवस दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती संजय केळकर यांनी दिली. याआधीही सप्टेंबर २०२२ मध्ये अनुराग ठाकुर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसांचा दौरा केला होता. (Maharashtra Political News)

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ल्ला

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. सलग दोन वेळा या मतदार संघातून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शिंदे यांचं या मतदार संघावर वर्चस्व आहे. छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी रात्री अपरात्री मतदार संघात फिरून डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्याशी जिव्हाळ्याचे संबध निर्माण केले आहेत. 

दरम्यान भाजपाचा पाठिंबा मिळवत एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. असे असतानाच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपने लक्ष केंद्रित करत शत प्रतिषत नारा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT