Maharashtra Political news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

Maharashtra Political news : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री असल्याची टीका शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी केली. काकडे यांच्या टीकेला पडळकर आणि खोत काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Akshay Badve

गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा राजकीय वादाला फुटलं तोंड

शरद पवार गटाचे अंकुश काकडे यांनी पडळकर व खोत यांना भाजपकडून पोसलेली कुत्री असं म्हणत टीका

भाजपवर संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप करत फडणवीस यांना कारवाईची काकडेंची मागणी

सांगलीच्या जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. तुझ्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरले, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री आहेत, अशा शब्दात अंकुश काकडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार गटाचे अंकुश काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अंकुश काकडे म्हणाले, 'गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली एक कीड आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर कोणी नेलं नव्हतं. त्या ऐतिहासिक काम गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. आम्ही संस्कृती आणि राजकारणाचा स्तर सांभाळतो. आम्ही चुकीचं काम करणाऱ्या माणसाला पाठिंबा देत नाही, अशी उदाहरणं भाजपकडून दिले जातात'.

'महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला घालणाऱ्या सांगलीच्या माणसाला देवेंद्र फडणवीसांंनी समज दिली असे म्हणतात. समज दिल्यानंतर सुद्धा पडळकर यांनी आता वक्तव्य केलं आहे. सांगली जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम राजारामबापू पाटील यांनी केलं. त्यांचाच वसा घेऊन जयंत पाटील काम करत आहेत. असा नेता आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल पडळकर हे अशी वक्तव्य करतात. मला त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा नाही. घाणी कडून स्वच्छता मिळेल असं वाटत नाही, असे काकडे म्हणाले.

पडळकर आणि खोत यांच्यावर जहरी टीका करताना अंकुश काकडे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्वयंसेवक संघाचे स्वतःला कार्यकर्ते समजतात. गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत ही पोसलेली कुत्रे आहेत. परंतु चंद्रकांत पाटील यांनी परवा केलेले वक्तव्य हे भाजप कुठल्या स्तरावर पोहोचलाय हे कळतं. एक ऑक्टोबरला सभा घेऊन मी सगळ्यांचा बुरखा पडणार आता विचारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. तुम्ही किती लोकांचा बुरखा पडणार आहात? ज्यांचा बुरखा फाडायचा होता ते तुमच्याकडे बुरखा घालून आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही बुरखा पाडण्याची भाषा करू नका.

'ज्या पुणेकरांनी तुम्हाला दहा वर्ष स्थान दिलं. त्या पुण्याची सांस्कृतिक पातळी सुद्धा तुम्ही ओलांडली आहे. हे तुम्हाला शोभणार नाही. देवेंद्र फडणीस यांनी गोपीचंद पडळकर याला तात्काळ पक्षातून बाजूला केले पाहिजे. राजकारणात म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता काम नये, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT