
बुधवार,१ ऑक्टोबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,नावरात्रोत्थापन व पारणा, महानवमी.
तिथी-नवमी १९|०२
नक्षत्र-पूर्वाषाढा
रास-धनु १४|२७ नं. मकर
योग-अतिगंड
करण-बालव
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - चरतत्वाची असणारी आपली रास. आज विशेषत्वाने देवी उपासना सुद्धा फलदायी होईल. नवरात्राचे पारणे, या निमित्त तीर्थक्षेत्री भेटण्याचे योग आहेत. काही भाग्यकारक घटना आज घडतील असा विश्वास ठेवा.
वृषभ - कामांमध्ये उगाचच अडचणी उद्भवण्याचा संभव आहे. विनाकारण मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाला मात्र हात सैल राहील असे दिसते आहे.
मिथुन - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधून पुढे जाल. कामाच्या बाबतीत भागीदारी व्यवसायामध्ये सुद्धा सुयश लाभणार आहे. कोर्टाच्या कामात मनासारख्या गोष्टी घडतील.
कर्क- आज शत्रूंचा त्रास संभवत आहे. कदाचित वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी यामध्ये पाण्यापासून होणारे रोग, मानसिक आजार यापासून काळजी घ्या.
सिंह - आर्थिक क्षेत्रात नव्याने धाडस करायला हरकत नाही. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. आपल्यामधील नवनवीन गोष्टी कार्यान्वित होतील. संतती सौख्य या दृष्टीने दिवस चांगला आहे.
कन्या- प्रॉपर्टीचे सौख्य आज लाभणार आहे. मनात आलेल्या इच्छा परिपूर्णतेकडे जाण्याचा आजचा दिवस आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होण्याची दाट शक्यता आहे.
वृश्चिक - व्यवसायामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आज प्रयत्न कराल. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आज गरजेचे आहे. काही वेळेला मौन धारण करते जास्त बरे राहील.
धनु - आपले मनोबल वाढवणारी एखादी घटना आज घडणार आहे. जीवनामध्ये जे अपेक्षले असेल अशा विषयी नवीन दिशा आणि नवीन मार्ग आज सहज सापडतील. दिवस चांगला आहे .
मकर - आपले रास कितीही हिशोबी असेल, कंजूस असेल तरीसुद्धा आज काही बाबतीत दक्षता घ्यावी लागेल. आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची काळजी घ्या. तब्येतीच्या तक्रारी सुद्धा जाणवतील.
कुंभ - आपल्या प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. दिवसाची सुरुवात चांगल्या घटनांनी आणि शेवटही चांगल्या घटनांनी होईल. दैनंदिन कामे सहज मार्गे लागण्याचा दिवस आहे.
मीन - तुमचे असणारे कार्यक्षेत्रामध्ये आज मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. एकूणच घडत असणाऱ्या गोष्टींमुळे तुमचा उत्साह आणि उमेद वाढेल. प्रगतीकडे वाटचाल होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.