Vastu Tips: किचनमध्ये भांडी किंवा अन्न सतत खाली पडतंय? या संकेताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Kitchen Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार, अशा घटना काही महत्त्वाचे संकेत देतात. विशेषतः जर तुमच्या किचनमध्ये (स्वयंपाकघरात) सतत भांडी किंवा अन्न खाली पडत असेल, तर हे काही अशुभ संकेत असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते.
Kitchen Vastu Tips
Kitchen Vastu Tipssaam tv
Published On

मन:शांतीसाठी लोक पूजा-पाठ करतात. काहींचा असा विश्वास असतो की, यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. पण फक्त पूजा-पाठ नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आणि रोजच्या सवयींमध्येही काही बदल केल्यास अनेक संकटांपासून सुटका मिळू शकते.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही गोष्टींचे विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. वेळेत लक्ष दिल्यास आपल्या जीवनातील अर्धी चिंता कमी होऊ शकते.

Kitchen Vastu Tips
Broom Astro Tips: घरात 'या' दिशेला झाडू ठेवाल तर व्हाल कंगाल; लक्ष्मी नाराज होण्याचा धोका

मीठ आणि तेल पडणं

शास्त्रानुसार स्वयंपाकघरात वारंवार मीठ किंवा तेल पडणं अशुभ मानलं जातं. हातून सतत मीठ पडत असेल तर ते आर्थिक अडचणीचे संकेत असतात. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तेल सांडणं हे शनी देव रुष्ट असल्याचं लक्षण मानलं जातं. अशा वेळी शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करणं आवश्यक ठरतं.

Kitchen Vastu Tips
Vastu Tips : तुमच्या घरातील घड्याळ कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असेल तर बसेल आर्थिक फटका

भांडी पडणं वा तुटणं

स्वयंपाकघरात वारंवार भांडी पडणे किंवा तुटणे हेही अशुभ संकेत मानले जातात. हे एखाद्या मोठ्या संकटाचं लक्षण असू शकतं. जर असं वारंवार घडत असेल तर सावध होणं गरजेचं आहे. यामुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात.

Kitchen Vastu Tips
Vastu Tips Wall Clock: वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती?

नळातून पाणी गळणे

स्वयंपाकघरातील नळातून पाणी सतत गळत राहणं किंवा अगदी थेंबथेंब गळणंही शुभ मानलं जातं नाही. याचा थेट अर्थ अनावश्यक खर्च वाढणार, असा होतो. त्यामुळे नळाची गळती त्वरित थांबवणं आवश्यक आहे.

Kitchen Vastu Tips
Clock Vastu Shastra: चुकीच्या दिशेला लावलेलं घड्याळ आयुष्यात आणेल वाईट वेळ; कंगाल होण्यापूर्वी जाणून घ्या वास्तू टीप्स

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com