Dhananjay Munde Anjali Damania  Saam Tv
महाराष्ट्र

Anjali Damaniya: धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच, पुरावे सादर करत अंजली दमानियांनी मुंडेंच्या घोटाळ्याचा पाढाच वाचला

Anjali Damania on Dhananjay Munde DBT scheme scam: ४ फेब्रुवारीला अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पुराव्यासकट पाढाच वाचला.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आरोपींसंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत पुरावे सादर केले आहेत. ४ फेब्रुवारीला अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पुराव्यासकट पाढाच वाचला. धनंजय मुंडे यांनी एका वर्षात अफाट पैसे खाल्ले असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी अनेक दावे करत खळबळजनक आरोप केले आहेत. डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलं असल्याचा खुलासा दमानिया यांनी केला आहे.

मुंडे कृषीमंत्री असताना नॅनो युरिया, नॅमो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत २७५ कोटींचा घोटाळा केला असल्याचा खुलासाही दमानिया यांनी केलाय. नॅनो युरियाची बॉटलला ९२ रूपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. तेव्हा २२० रूपयांना बॉटल घेतली. तेव्हा १९ लाख ३८ हजार ४०८ बॉटल २२० रूपयांमध्ये खरेदी केली. म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त किंमतीनं बॉटल घेतल्या असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याची माहिती दिली.

तसेच गोगलगायी निर्मुलनाचं औषधही अव्वाच्या सव्वा दरानं खरेदी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. एकेक बॅटरी स्प्रेअरमध्ये त्यांनी पैसे लाटले. ५० कोटींचे डिलरशीपचे नियम देखील बदलण्यात आले. कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीत ४२ कोटींचा घोटाळा केलाय. धनंजय मुंडे यांनी वर्षभरात अफाट पैसे खाल्ले असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

भगवान गडावर जाऊन पुरावे सादर करणा

धनंजय मुंडे यांनी केलेले घोटाळे पुराव्यासकट भगवान गडावर दाखवणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलं. नम्रपणे सर्व पुरावे दाखवणार आणि धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी करावी, अशी विनंती करेन, असंही अंजली दमानिया म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत ४ वर्षीय हरवलेली मुलगी सुरक्षित आईकडे परत

Operation Akhal : रक्षाबंधनाच्या दिवशी २ जवान शहीद; ऐन सणासुदीत सैन्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मोठी बातमी! जुन्या मंदिराची भिंत कोसळली; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जण एकाच कुटुंबातले

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळ्याची आठवणही नाही राहणार, कोल्हापूरजवळचं 'हे' निसर्गरम्य ठिकाण देईल खरी मजा

Latur News : त्रास मुतखड्याचा उपचार किडनीचा; डॉक्टरांनी परस्पर किडनीच काढली रुग्णाचा दावा

SCROLL FOR NEXT