Maharashtra Live News Update: पुण्यात पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२५, संसदेच्या पावसाळी अधिवेशन अपडेट, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुणे रेव्ह पार्टी प्रकरण अपडेट, रक्षाबंधन २०२५, लाडकी बहीण योजना अपेट राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस अलंकार परिधान

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमे निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.

त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड, मोहनमाळ, तुळशीची माळ तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.

शेतकरी नेते रविकांत तुपकराचं रक्षाबंधन सेलिब्रेशन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आक्रमक भूमिका घेणारे, फायर ब्रँड नेते रविकांत तुपकर आंदोलन सोडून कधी कधी सण आणि संस्कृती जोपासताना नाही दिसतात. रविकांत तुपकर यांनी आज सकाळीच बुलडाणा शहरात मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले. तुपकरांची मोठी बहीण मीनाताई ह्या पळसखेड गावच्या पोलीस पाटील आहेत. आंदोलन, राज्यभर दौरे, सभा या गडबडीत वर्षभर बहिणीकडे जाणे होत नाही.

सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोन आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात

- यामध्ये राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलेय.

- या दोन आरोपीना कर्नाटकातील इंडी गावातून ताब्यात घेतलेय

- आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हांडेचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल

- यापुर्वी अमित सुरवसेसह 4 आरोपीना काल न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती

- त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास सोलापूर पोलीसांनी आणखी दोन आरोपीना ताब्यात घेतले

Pune News: पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

शहरात १०० टक्के पाणी मीटर बसवा

शहरातील २ लाख ६३ नळ जोडणीपैकी अवघे १ लाख ८५ हजार मीटर बसवण्यात आले

अजून ७७ हजार बाकी आहेत एका महिन्यात कस उद्दिष्ट पूर्ण होणार याची चर्चा

दिवसाला २ हजार मीटर बसवणे अपेक्षित असताना अवघी ३०० मीटर बसवले जातात

पुण्यातील कबुतराचा खाद्यबंदीचा बाद आता थेट उच्च न्यायालयात

महापालिकेने शहरातील २० ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी केली आहे

त्याच उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपयाचा दंड केला जातो

मात्र पुण्यातील शाश्वत फाउंडेशनने या बंदीला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे

२०२३ मध्ये पालिकेने हा निर्णय घेतला होता

मात्र कबुतरांचा हक्क हिरावून घेतला जातोय फाउंडेशनच म्हणणं

उच्च न्यायालयात याचिका केली दाखल

पुणे शहरात महापालिकेने १ एप्रिल पासून बुजवले जवळपास ११ हजार ३८२ खड्डे

पालिका म्हणते शहरात केवळ २४७ खड्डे बुजवणे बाकी

मात्र शहरात नागरिकांच्या खड्ड्या विषयी अनेक तक्रारी

पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास

मात्र पालिकेने जवळपास ११ हजार खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा

महापालिका आयुक्त कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं

सुरक्षा व्यवस्थेत कसूर केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकांची दुसरीकडे बदली

सुरक्ष रक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत

सुरक्षा रक्षक असताना मनसे पदाधिकारी विनापरवानगी आत कसे घुसले आणि त्यानंतर गोंधळ झाला

सुरक्षेत कसूर ठेवल्या विरोधात सुरक्षा रक्षकांची बदली

नंदुरबार जिल्ह्यात आज दिवसभर असणार जागतिक आदिवासी दिनाची धूम

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्स....

शहादा तालुक्यातील परिवर्दा जिल्हा परिषद शाळेत आदिवासी दिनानिमित्त खास कार्यक्रमाचा आयोजन...

आदिवासी परंपरा जपणाऱ्या पारंपारिक वेशभूषा परिधान करत चिमुकल्याने धरला आदिवासी गाण्यांवर ठेका....

आदिवासी महिलांचे पारंपारिक पोशाख असलेल्या नाटी परिधान करून विद्यार्थिनींनी सादर केला डान्स....

आदिवासी गाण्यांवर थिरकले जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी.....

ड्रग्स प्रकरणावरुन खा.ओमराजे निंबाळकर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप

ड्रग्स प्रकरणातील जामीनावर बाहेर असलेले आरोपी विनोद गंगणे याच्या पाठीवर महसूलमंत्री बानकूले यांनी तुळजापुरात झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात कौतुकाची थाप मारल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एखदा तापले आहे.धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एखदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

पोस्टर बॉय'चा अनोखा उपक्रम; एसटी बस स्थानकातून 'राखी'चा सामाजिक संदेश

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या एक वेगळाच उपक्रम चर्चेत आहे.

दापोली एसटी बस स्थानकात एक तरुण हातात एक भावनिक संदेश असलेला पोस्टर घेऊन उभा आहे.

या पोस्टरवर लिहिलेल्या वाक्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

"राखी बांधून जाशील का… पण तू माझी खरी लाडकी बहीण होशील का?" हा प्रश्न विचारणा-या 'पोस्टर बॉय' याची चर्चा सध्या प्रवाशांमध्ये सुरू आहे

Maharashtra Live News: सातपुड्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी तरुणीची गगन भरारी

परिस्थिती मात करत आदिवासी तरुणी बनली धावपटू....

नुकत्याच जर्मनी देशात झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत आरती पावरा चा सहभाग....

आदिवासी तरुणीची विदेशात केलं भारताच प्रतिनिधित्व....

यवतमाळ जिल्ह्यातील पाच महसुली मंडळात अतिवृष्टी

यवतमाळ जिल्ह्यात वीस दिवसानंतर बरसलेल्या पावसाने कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांना उभारी मिळाली आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार असून पावसाची सरासरी 28 मिमी नोंद करण्यात आली आहे, तर पाच मंडळात हा पाऊस जोरदार बसल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai-Nagpur Special Train: नागपूर स्पेशल ट्रेन सव्वा सात तास लेट

- एक्झामिनेशन करण्यासाठी ट्रेन लेट सोडली असल्याचा प्रशासनाची माहिती

- ज्या प्रवाशांनी ट्रेनसाठी आरक्षण केलेले होते त्यांना काल सायंकाळी सात वाजताच याची माहिती देण्यात आली होती

- ट्रेन उशिराच सुटणार होती असा मेसेज आरक्षित प्रवाशांना करण्यात आला होता

- मात्र ज्यांचे तिकीट कन्फर्म नव्हते त्यांना याबाबत माहिती नसल्याने त्यांची झाली गैरसोय

मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची मुदतवाढीसाठी हालचाली

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पद भरतीला मंजुरी मिळाली असून पदभरती आपल्याच काळात व्हावी यासाठी संचालकांचे प्रयत्न सुरू आहे.

यामुळे आता संचालकांनी मुदत वाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याचे कारण देत मुद्दत वाढीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला आहे.

नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बनावट सावकर उभा करून कोट्यावधींची जागा शेतकऱ्याची लुटली

पनवेल तालुक्यातील साई गावातील भोंडकर कुटुंबाची 108 गुंठे जागा विकण्याचा पराक्रम नायब तहसीलदार एम के म्हात्रे आणि मंडळ अधिकारी दमयंती म्हात्रे यांनी केल्या आहे त्या जागेचा मालक उभा करून सावकार बनावट पद्धतीने त्या शेतकरी जागा त्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून पनवेल येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा शेतकऱ्यांनी नेला अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

यवतमाळमध्ये सराईत गुन्हेगारी टोळीतील 12 जणांवर मोकका

सध्या यवतमाळ पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत असून उमरखेड शहरातील गुन्हेगारी टोळीतील आरोपी शेख मुदस्सीर, शेख जमील यांच्यासह 12 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात यांची मोठी चर्चा होत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्हेगारांच्या कुठल्या बाहेर काढण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनांना दिले आहे त्यामुळे अजून किती जणांवर मोकका अंतर्गत कारवाई केल्या जाते हे पाहावे लागणार आहे.

Mumbai-Nagpur Special Train: 6 तास उलटूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ट्रेन आलीच नाही

प्रवासी प्रचंड संतप्त

प्रवश्यानी रेल्वे स्थानकात घातला राडा

मध्य रात्री १२ वाजता येणारी विशेष ट्रेन सहा तास उलटले तरी आली नाही

रेल्वे प्रशासनाचा चालकाशी संपर्कच होत नसल्याचे अधिकारी देत आहेत कारण

अधिकाऱ्यांना ही घातला प्रवाश्यांनी घेराव

सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा घेतला प्रवाश्यांनी पवित्रा

रेल रोको करण्याच्या प्रवासी तयारीत

ड्रग्ज पार्टीत पोलिसांनी पकडलेल्या खडसेंचे जावई प्राजंल खेवलकरचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

खेवलकरच्या मोबाईलमध्ये ज्या व्हिडिओ क्लीप सापडल्यात, त्या पैकी 4 तरुणींनी पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती आहे.

या तरुणींनी तक्रार केल्यास खेवलकरविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत दिली होती माहिती..

पोलिसांनी शोध घेतलेल्या महिला तक्रार दाखल करतात का ते पाहावं लागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com