Surabhi Jayashree Jagdish
कोल्हापूरजवळ फिरायला जायचंय आणि शांत ठिकाण हवंय तर तुम्ही आंबा घाटाला भेट देऊ शकता.
कोल्हापूरपासून सुमारे 60 किलोमीटर दूर असलेला, आंबा घाट हा एक लपलेलं रत्न मानलं जातं.
आंबा घाट त्याच्या हिरव्यागार दऱ्या, उंच डोंगर आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजूनच खुलून येतं.
आंबा घाटाजवळील अंबा वन हे अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवांचं घर आहे. इथं तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता आणि दुर्मिळ पक्षी व प्राण्यांना पाहू शकता.
या ठिकाणी विशाळगड किल्ला आणि पन्हाळा किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले जवळ आहेत. त्यामुळे तुम्ही निसर्गासोबत इतिहासाचाही अनुभव घेऊ शकता.
आंबा घाटाच्या आजूबाजूला अनेक सुंदर ट्रेकिंग आणि हायकिंगचे मार्ग आहेत.
आंबा घाट हे एक असं ठिकाण आहे, जिथं तुम्ही शहरी जीवनातील धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत विसावू शकता.