anil patil criticizes eknath khadse on his delhi tour Saam Digital
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या दिल्ली दाै-यावर अनिल पाटील म्हणतात, बेगानी शादी में... (पाहा व्हिडिओ)

anil patil criticizes eknath khadse on his delhi tour : भाजपच्या नेत्यांवर टीका करणा-यांना महायुतीत घेऊ नये असा माझा प्रामाणिक सल्ला महायुतीच्या नेत्यांना असणार आहे असे मंत्री अनिल पाटील यांनी आज माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

संजय महाजन

देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले याचा आम्हांला मोठा आनंद झाला आहे असे मंत्री अनिल पाटील यांनी नमूद केले. दूसरीकडे एकनाथ खडसे यांचा दिल्लीला जाणं म्हणजे बेगाने शादी मे... असेच आहे अशी बाेचरी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मंत्री अनिल पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या दिल्ली दाै-यावर केली.

मंत्री अनिल पाटील म्हणाले एकनाथ खडसे हे कोणत्या पक्षात आहेत, त्यांना वरतून कोणी बोलवलेलं नाही. मात्र सासरा म्हणून त्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी कोणी बोलवल असेल तर ते दिल्लीला गेले असतील.

पाटील म्हणाले निवडणुक काऴात खडसेंनी लवकरच भाजपात येणार असल्याचे म्हटले. एकनाथ खडसे यांची कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत प्रवेशासंदर्भात चर्चा झालेली आहे असे मला वाटत नाही. मात्र खडसेंच्या या गोष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य कमी झाले.

जळगाव जिल्हा मंत्रीमय

रक्षा खडसे यातील तिसऱ्यांदा देणारे खासदार होऊन त्यांना मंत्रिपद मिळते याचा मोठा आनंद आहे. आता जळगाव जिल्हा मंत्र्यांनी भरलेला जिल्हा वाटतोय. भाजपचा मंत्री, शिवसेना शिंदे गटाचा मंत्री, राष्ट्रवादीचा मंत्री आणि आता केंद्राचे मंत्री. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना एकत्रित येऊन जिल्ह्याचा विकास करताना सोपं होणार आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांना शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन असेही मंत्री अनिल पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहराच्या दौऱ्यावर

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Horoscope Sunday : बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमध्ये विनाकारण वाद होणार; या राशींच्या लोकांचे मनोबल कमी होणार,वाचा रविवारचं राशीभविष्य

Purva Bhadrapada Nakshatra : पूर्वा भाद्रपदा नक्षत्र; रविवारचा दिवस ठरणार बदलांचा! वाचा संपूर्ण भविष्य

Viprit Rajyog 2025: 30 वर्षांनंतर मार्गी शनी बनवणार विपरीत राजयोग; 'या' राशींना मिळणार नवे उत्पन्नाचे स्त्रोत

SCROLL FOR NEXT