anganwadi sevika jail bharo andolan in amravati saam tv
महाराष्ट्र

Amravati : अमरावतीमध्ये शेकडाे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी छेडलं जेलभरो आंदोलन

Amravati Anganwadi Sevika Morcha : या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त हाेता.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

विविध मांगण्यांची राज्य सरकारकडून पूर्तता हाेत नसल्याने अमरावती शहरात आज (साेमवार) शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी सरकार विराेधात घाेषणाबाजी केली. पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारने घोषणा केलेल्या वाढीव 1500 रुपयांची पूर्तता न केल्याने आज आंदोलन छेडण्यात आले. या सोबतच सेंट्रल किचन बंद करण्यात यावे, पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन एकत्रित सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे या प्रमुख मागण्या घेऊन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आज जेलभर आंदोलन केले.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो शालेय पोषण आहार कर्मचारी महिला या आंदोलनात सहभागी झाले हाेते. यावेळी आंदाेलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त हाेता. काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा चाळीसगावात अपघात

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT