Bacchu Kadu On BJP : 'थाेडा थाेडा अनुभव आम्हांलाही येतोय'; जानकरांच्या विधानानंतर भाजपवर बच्चू कडू स्पष्टच बाेलले

अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम असल्याचं कडू यांनी आज स्पष्ट केले. ते म्हणाले पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय आहे.
prahar to contest lok sabha election from amravati constituency
prahar to contest lok sabha election from amravati constituencySaam TV
Published On

- अक्षय गवळी

Akola News :

महादेव जानकरांनंतर (mahadev jankar) आता बच्चू कडूही (bacchu kadu latest marathi news) भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी यवतमाळ (yavatmal) इथं केलं होतंय. जानकरांच्या या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही आज (शनिवार) अकाेला (akola) येथे समर्थन केलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार बच्चू कडू म्हणाले महादेव जानकर म्हणतात तसा आपल्यालाही भाजपचा असाच अनुभव येत आहे. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन काम झालं की सोडून द्यायचं अशी असल्याचा टोला कडूंनी लगावला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले असल्याचे बच्चू कडू यांनी नमूद केले.

prahar to contest lok sabha election from amravati constituency
Eknath Shinde Meets Udayanraje Bhosale : मुख्यमंत्री म्हणाले, उदयनराजेंच्या साक्षीने सांगताे... (पाहा व्हिडिओ)

दरम्यान, अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम असल्याचं कडू यांनी आज स्पष्ट केले. ते म्हणाले पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय आहे. नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्तेच निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दांत भाजपला सुनावले.

Edited By : Siddharth Latkar

prahar to contest lok sabha election from amravati constituency
Ajay Baraskar : अजय बारस्कर यांच्याशी संबंध नाही; देहू संस्थान जरांगेंच्या पाठीशी (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com