मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर (ajay baraskar) यांचा देहू आणि देहू संस्थानशी संबंध नाही असा खूलासा आज (शनिवार) देहू संस्थानने केला आहे. देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे असे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे बारस्कर यांनी मी देहूतून आलो आहे असे देखील सांगितले. त्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी बारस्कर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसताना ते विनाकारण देहूची नाव खराब करत आहेत. देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थान कडून व्यक्त करण्यात आला.
Edited By : Siddharth Latkar