Rasta Roko Andolan In Maharashtra : मराठा समाज उतरला रस्त्यावर, प्रमुख गावांसह महामार्गांवरील वाहतुक ठप्प, जाणून घ्या तुमच्या गावातील स्थिती

Maratha Reservation : सगेसोयरे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरू केले.
maratha samaj rasta roko andolan in maharashtra traffic update of old pune mumbai highway
maratha samaj rasta roko andolan in maharashtra traffic update of old pune mumbai highwaysaam tv
Published On

दिलीप कांबळे / विनाेज जिरे / संजय सूर्यवंशी / अजय साेनवणे

Maratha Samaj Rasta Roko Andolan :

सकल मराठा समाजाकडून आज (शनिवार) राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यास प्रारंभ झाला आहे. कार्ला फाट्यावर रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ झाल्याने जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. बीड जिल्ह्यातील पेंडगावमध्ये सोलापूर - धुळे महामार्गावरील आंदोलनामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राज्यातील अन्य भागात देखील रास्ता राेकाे आंदाेलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (Maharashtra News)

राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी आजपासून मराठा समाजाने रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा निर्धार व्यक्त केला हाेता. त्यानूसार आज गावागावात मराठा बांधव रास्ता रोको आंदोलन करीत आहेत.

maratha samaj rasta roko andolan in maharashtra traffic update of old pune mumbai highway
Pune Accident News : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 9 वाहनं एकमेकांवर आदळली; जाणून घ्या महामार्गावरील वाहतूकीची स्थिती

मावळ तालुका सकल मराठा समाजाकडून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील एकविरा देवीच्या कार्ला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान मुंबई पुणे जुन्या हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रंगात रांगा लागल्या होत्या.

नांदेडमध्ये युवकाने मोटारसायकल जाळून केला रास्ता रोको

नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलनाने पेट घेतला आहे. जिल्हा भरात मराठा समाज रस्त्यावर उतरला असून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलन दरम्यान नांदेडच्या लोंढे सांगवी येथील शिवहरी लोंढे या मराठा तरुणाने उस्मान नगर रस्त्यावर आपली स्वतःची दुचाकी जाळून रास्ता रोको आंदोलन केले. सरकारचा निषेध करत या मराठा तरुणाने आपली स्वतःची दुचाकी जाळली.

maratha samaj rasta roko andolan in maharashtra traffic update of old pune mumbai highway
Success Story : भंडा-यातील शेतक-याच्या जीवनात पेरुने निर्माण केला गोडवा, 10 लाखांची कमाई

बीडच्या परळीत मराठा समाजाचा रास्ता रोको

सगेसोयरे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरू केले. जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बीडच्या परळीत आज मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यातील परळीत बीड व गंगाखेड रस्त्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक - इटके कॉर्नर येथे मराठा समाजाने रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले. या चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यात गाड्या लावून आंदोलकांनी वाहतूक थांबवत राज्य शासनाचा निषेध केला आहे.

maratha samaj rasta roko andolan in maharashtra traffic update of old pune mumbai highway
Beed Electric Bus : बीडकरांचा प्रवास होणार स्वस्तात, एप्रिलपर्यंत ईव्ही बस हाेणार दाखल

मराठा आंदोलकांनी मालेगावात मुंबई आग्रा महामार्ग रोखला

मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर मालेगावात ठिकठिकाणी रस्ता रोको केला. मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर रास्ता रोकोत सहभागी झाले हाेते. एक मराठा लाख मराठा घोषणा देत त्यांनी रास्ता राेकाे केल्याने मुंबई आग्रा महामार्ग वरील वाहतूक ठप्प झाली. विद्यार्थी आणि अँब्युलन्सला अडचण होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हाेता.

Edited By : Siddharth Latkar

maratha samaj rasta roko andolan in maharashtra traffic update of old pune mumbai highway
Bacchu Kadu : आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? राणांचा उल्लेख टाळत बच्चू कडूंनी पुन्हा भाजपला डिवचलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com