anganwadi sevika andolan in nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Anganwadi Karmchari Morcha : अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी उद्धटवर्तन? हजाराे सेविकांचा नंदुरबार झेडपीवर थाळी नाद माेर्चा; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Nandurbar Latest Marathi News : नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ बदलण्याची मागणी यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनास केली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी (anganwadi workers) उद्धटपणे बोलणे व अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी युवराज बैसाने (अंगणवाडी कर्मचारी संघटना, कार्याध्यक्ष महाराष्ट्र) यांनी केली आहे. आज (गुरुवार) हजारो अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेवर (nandurbar zilla parishad) थाळी नाद मोर्चा (morcha) काढला. त्यावेळी बैसाने यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना अधिक-यांवर उद्धटपणाचा आराेप केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपानंतर अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वारंवार कारवाईच्या धमक्या आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका करु लागल्या आहेत.

त्याबाबतची तक्रार घेऊन तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी हजारो अंगणवाडी सेविकांनी आज नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर थाळी नाद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली नाही तर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ बदलण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा उर्मटपणा त्वरित बंद करावा, अधिकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात यावी अशी मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT